आंतरराष्ट्रीय युवा दिन : 'अपयशाने न खचता ध्येयाचा पाठलाग करा' | पुढारी

आंतरराष्ट्रीय युवा दिन : 'अपयशाने न खचता ध्येयाचा पाठलाग करा'

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा  आंतरराष्ट्रीय युवा दिन विद्यार्थिदशेतच करिअरची दिशा ठरवून व्यक्तिमत्त्वात योग्य ते बदल घडवले पाहिजेत. अपयशाने खचून न जाता ध्येयाचा पाठलाग केल्यास हमखास यश मिळते, असे प्रतिपादन महानगरपालिकेचे उपायुक्त रविकांत अडसूळ यांनी केले.

आंतरराष्ट्रीय युवा दिन दै. ‘पुढारी’ प्रयोग सोशल फाऊंडेशन व यशवंतराव चव्हाण (केएमसी) कॉलेज यांच्या वतीने आयोजित ‘युवक ते सक्षम अधिकारी बनताना’ या विषयावरील मार्गदर्शन सत्रात ते बोलत होते.

आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त दै. ‘पुढारी’च्या अधिकृत फेसबुक पेजवर ऑनलाईन पद्धतीने उपक्रम झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य प्रशांत नागावकर होते.

यावेळी उपायुक्त अडसूळ म्हणाले, ए. पी. जे. अब्दुल कलाम, विक्रम साराभाई यांच्यासारखे व्यक्तिमत्त्व नेहमीच युवावर्गास प्रेरणादायी आहेत, त्यांच्या आदर्शावर वाटचाल केली पाहिजे.

सोशल मीडियाचा प्रभावी वापर करताना पालकांनी सजग राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे. व्यक्तिमत्त्व घडवत असताना वेळेनुसार बदल करून ते अंगीकारले पाहिजेत.

ध्येयाचा पाठलाग करताना शॉर्ट टर्म व लाँग टर्म ऑब्जेक्टिव्ह असे वर्गीकरण करणे आवश्यक आहे.

प्रशासकीय सेवेत गेल्यावर लोकाभिमुख कार्यपद्धती अवलंबली पाहिजे.

यावेळी विनायक मेस्त्री, प्रा. रवींद्र मांगले, डॉ. संजय कांबळे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक उपस्थित होते.

पहा व्हिडिओ : ज्ञानकौशल्य आणि वागणूक हीच यशाची गुरुकिल्ली

Back to top button