गडचिरोली : १२ लाखांचे बक्षीस असलेल्या २ जहाल नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

gadchiroli police with naxlite
gadchiroli police with naxlite
Published on
Updated on

गडचिरोली : पुढारी वृत्तसेवा

१२ लाख रुपयांचे बक्षीस असलेल्या दोन जहाल नक्षल्यांनी आज गडचिरोली पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले. रामसिंग उर्फ सीताराम बक्का आत्राम (वय ६३) व माधुरी उर्फ भुरी उर्फ सुमन राजू मट्टामी (वय ३४) अशी आत्मसमर्पण केलेल्या नक्षल्यांची नावे आहेत. रामसिंग हा अहेरी तालुक्यातील अर्कापल्ली, तर माधुरी ही एटापल्ली तालुक्यातील गट्टेपल्ली येथील रहिवासी आहे. दोघांवरही खून, चकमक आणि दरोड्याचे गुन्हे दाखल आहेत. सरकारने दोघांवरही प्रत्येकी सहा लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते, अशी माहिती पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी दिली.

सरकारने जाहीर केलेली आत्मसमर्पण योजना, वर्षभरात विविध चकमकीत माओवांद्याचा झालेला खात्मा तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून आत्मसमर्पण केले.

रामसिंग हा २००५ मध्ये अहेरी दलममध्ये भरती झाल्यानंतर पेरमिली दलमचा सदस्य झाला. त्यानंतर तो अबुझमाडमध्ये तांत्रिक दलममध्ये कार्यरत राहिला. २०१२ पासून तो भामरागड एरिया तांत्रिक दलममध्ये एसीएम पदावर कार्यरत होता. माधुरी मट्टामी ही २००२ मध्ये कसनसूर दलममध्ये भरती झाली. पुढे भामरागड दलम आणि सध्या पेरमिली दलमच्या एसीएम पदावर ती कार्यरत होती.

२०१९ ते २०२२ या कालावधीत आतापर्यंत एकूण ४९ जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. जे माओवादी विकासाच्या प्रवाहात सामील होण्यास इच्छूक असतील त्यांना लोकशाहीतील सन्मानाचे जीवन जगण्यासाठी गडचिरोली पोलिस दल सर्वतोपरी मदत करेल. तसेच त्यांनी हिंसेचा त्याग करुन शांततेचा मार्ग स्वीकारावा, असे आवाहन पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी केले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news