नागपूरमध्ये उष्माघाताने रिक्षाचालकाचा मृत्यू

नागपूर, पुढारी वृत्तसेवा :
हवामान विभागाने पश्चिम विदर्भात गुरुवारपर्यंत उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. नागपूरमध्ये वाढत्या उकाड्यामुळे सध्या जीवाची लाहीलाही होत असतानाच सीताबर्डी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आनंद टॉकीजजवळ एका रिक्षाचालकाचा रिक्षामध्ये मृतदेह आढळला. उष्माघाताने रिक्षाचालकाचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.
बुधवारी (दि ११) दुपारी २ च्या सुमारास ही व्यक्ती मृतावस्थेत सापडली. प्राथमिक वैद्यकीय तपासणी केली असता उष्माघातामुळे रिक्षा चालकाचा मृत्यू झाला. मृतदेह रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, अकोला, वाशिम, बुलडाणा आणि अमरावती या जिल्ह्यात उष्ण हवेमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या घटनेनंतर नागपूरमध्ये उष्माघाताने मृत्यू होण्याचा आकडा हा दहावर पोहोचलेला आहे. पुढील काही दिवस नागपूरसह विदर्भात उन्हाचा कडाका असाच कायम राहणार असल्याचे नागपूर वेधशाळेने स्पष्ट केले आहे.
हेही वाचलंत का ?
- Indian Soldiers Skeletons : १८५७ च्या स्वातंत्र्यसंग्रामातील २८२ शहिदांचे सापडले सांगाडे
- चंद्रपुरातील “त्या” नरभक्षक बिबट्याला गोळ्या घालून ठार मारण्याचे आदेश !
- भीषण… आई-वडिलांनीच 11 वर्षाच्या मुलाला 22 कुत्र्यांसोबत घरात ठेवले डांबून