Indian Soldiers Skeletons : १८५७ च्या स्वातंत्र्यसंग्रामातील २८२ शहिदांचे सापडले सांगाडे

Indian Soldiers Skeletons : १८५७ च्या स्वातंत्र्यसंग्रामातील २८२ शहिदांचे सापडले सांगाडे
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : अमृतसर जवळील एका ठिकाणी विहिरीच्या खोदकाम दरम्यान तब्बल २८२ सांगाडे (Indian Soldiers Skeletons) आढळून आले आहेत. हे सांगाडे १८५७ च्या स्वातंत्र्य संग्रामातील (The Indian Rebellion of 1857) शहीद झालेल्या सैनिकांचे असल्याचे प्रा. डॉ. जे.एस. सहरावत (Dr J.S. Sehrawat) यांनी सांगितले. प्रा. सहरावत हे पंजाब विद्यापीठातील मानव वंश शास्त्र विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. अमृतसर जवळील अजनाला येथे एका धार्मिक वास्तूखाली असणाऱ्या विहिरीच्या खोदकामावेळी हे सांगाडे सापडले.

यावेळी बोलताना प्रा. सहरावत म्हणाले, १८५७ च्या स्वातंत्र्य संग्रामात गाई आणि डुक्करांच्या मांसापासून बनविण्यात आलेल्या बंदुकीच्या काडतूसांना इंग्रजी राजवटीत असणाऱ्या भारतीय सैनिकांनी विरोध केला होता. त्यानंतर भारतातील पहिले स्वांतत्र्य संग्राम लढले गेले होते. या सांगड्यांचा (Indian Soldiers Skeletons) अभ्यास केल्यानंतर येथे सापडलेली नाणी, पदके, डीएनएचा अभ्यास आणि रेडिओ-कार्बन डेटिंग पद्धत यासर्व गोष्टी ही सांगडे १८५७ च्या काळातील सैनिकांची असल्याचे सिद्ध करतात.

मंगल पांडे यांचे बंड

१८५७ च्या स्वातंत्र्यसंग्रामाला भारतातील पहिले स्वातंत्र्य समर देखिल म्हटले जाते. इंग्रजांविरुद्ध झालेल्या या पहिल्या बंडाचे नायक मंगल पांडे हे होते. मंगल पांडे यांनी कलकत्त्याजवळील बराकपूरमध्ये बंडाची सुरुवात केली. २१ मार्च १८५७ रोजी बराकपूरमध्ये ३४ व्या बंगाल नेटिव्ह इन्फंट्रीच्या सैनिकांची परेड सुरू होती, तेव्हा मंगल पांडे यांनी ब्रिटिश सरकारविरुद्ध बंडाचे रणशिंग फुंकले. मंगल पांडे यांनी बराकपूरमधील आपल्या सोबत्यांना विरोध करण्याचे आव्हान दिले आणि घोड्यावरून त्याच्याकडे येणाऱ्या ब्रिटीश अधिकाऱ्यांवर गोळीबार केला.

जेव्हा इंग्रज अधिकाऱ्यांना मंगल पांडे यांना अटक करायची होती, तेव्हा त्यांनी स्वतःला गोळी मारून मरणे पसंद केले. पण मंगल पांडे जखमी झाले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले. ते बरे झाल्यानंतर त्याचे कोर्ट मार्शल झाले आणि त्यांना फाशीची शिक्षा सुनावली गेली.  त्यांच्या फाशीनंतर मेरठ, कसौली, कांगडा, धर्मशाळा यासह देशभरात अनेक ठिकाणी सैनिकांनी उठाव केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news