भीषण... आई-वडिलांनीच 11 वर्षाच्या मुलाला 22 कुत्र्यांसोबत घरात ठेवले डांबून | पुढारी

भीषण... आई-वडिलांनीच 11 वर्षाच्या मुलाला 22 कुत्र्यांसोबत घरात ठेवले डांबून

पुणे : पुढारी वृत्तसेवा

पुण्यातील कोंढवा परिसरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आई-वडीलांनी आपल्या 11 वर्षाच्या मुलाला तब्बल 22 हून अधिक कुत्र्यांसोबत घरात डांबून ठेवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार चाईल्डलाईन संस्थेच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी पोलिसात धाव घेत संबंधीत मुलाची सुटका केली. सर्वात गंभीर म्हणजे ही सर्व कुत्री रस्त्यावरील भटकी आहेत.

sedition law : राजद्रोहाचं कलम १२४ अ तूर्तास स्थगित, सुप्रीम कोर्टाचा आदेश

याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्या मुलाच्या आई-वडिलांना अटक केली आहे. गेल्या दोन वर्षापासून हा प्रकार सुरू होता. कुत्र्यासोबत एकलकोंडे ठेवल्यामुळे मुलाच्या मानसिक स्वास्थ्यावर परिणाम झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले.

आता संभाजीराजेंच्या दौर्‍यावेळी होणार कुलाचार, पूजाविधी, तुळजाभवानी मंदिर प्रशासनाचा निर्णय

कोंढवा येथील कृष्णाई इमारतीमध्ये हे कुटुंब राहण्यास आहे. ते राहत असलेल्या घरात 20 ते 22 कुत्री त्यांनी पाळली होती. दोघे प्राणी प्रेमी असल्याचे सांगतात. त्यातूनच त्यांनी ही कुत्री घरात ठेवली होती. अनेकदा सोसायटीच्या लोकांनी याबाबत तक्रार केली होती. त्यांचा 11 वर्षाचा मुलगा जवळपास दोन वर्षापासून कुत्री असलेल्या घरात राहत आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून हा मुलागा बंदीस्त जीवन जगत होता.

भाजप आमदार जयकुमार गोरेंच्या अडचणीत वाढ; अटकेपासून अंतरिम संरक्षण देण्यास नकार

तेथील एका अनोळखी व्यक्तीने चाईल्ड लाईन संस्थेला याबाबत माहिती दिली होती. त्यानुसार त्यांनी पाहणी केली असता, हा प्रकार समोर आला. संस्थेच्या वतीने याबाबत पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर कोंढवा पोलिसांनी मुलाला तेथून बाहेर काढून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

Back to top button