पवारांच्या घरावरील हल्ला प्रकरणी नागपुरातील एस. टी. कर्मचाऱ्याला घेतले ताब्यात | पुढारी

पवारांच्या घरावरील हल्ला प्रकरणी नागपुरातील एस. टी. कर्मचाऱ्याला घेतले ताब्यात

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबई स्थित सिल्व्हर ओक या निवासस्थानी एस. टी. कर्मचाऱ्यांनी केलेल्या हल्ल्याचे धागेदोरे नागपूर पर्यंत पोहोचले आहे. मुंबई पोलिस बुधवारी नागपुरातील बडतर्फ एस. टी. कर्मचारी संदीप गोडबोले याला नागपुरातून घेऊन गेले. गणेशपेठ आगारात यांत्रीक असलेल्या गोडबोले याला बडतर्फ करण्यात आले होते. अॅड. गुणवंत सदावर्ते यांच्या संपर्कात असलेल्यांमध्ये गोडबोले याचे नाव आल्याने त्याला नेण्यात आल्याचे समजते.

पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी याला दुजोरा दिला. मुंबई पोलिसांची एक टिम येथे आली होती. नागपूर पोलिसांच्या मदतीने त्यांनी गोडबोलेला ताब्यात घेतले, असे पोलिस आयुक्तांनी सांगितले. संपूर्ण राज्यातून अॅड. सदावर्ते यांच्या संपर्कात अनेकजण होते. त्यात नागपुरातुनही एक जण संपर्कात असल्याचे सरकारी वकीलांनी सांगितले होते. त्या नंतर गोडबोलेला ताब्यात घेण्यात आले आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button