गडचिरोली : पुढारी वृत्तसेवा : सिरोंचा येथे दर १२ वर्षांनी होणाऱ्या पुष्कर यात्रेला आजपासून (बुधवार) प्राणहिता नदीवर सुरुवात झाली. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्राणहिता नदीची पूजा-अर्चा करण्यात आली. त्यानंतर दुपारी ३.५० वाजता मंदिरातील देवतांच्या मूर्तींना स्नान घालण्यात आले. आणि हजारो भाविकांनी नदीत स्नान केले. याप्रसंगी आमदार धर्मरावबाबा आत्राम, आमदार डॉ. देवराव होळी, जिल्हाधिकारी संजय मीणा, पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील उपस्थित होते.
तेलंगणा-महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या सिरोंचासह गडचिरोलीची नवी ओळख देशभर होण्यास पुष्कर उत्सव महत्त्वाचा आहे, असे पालकमंत्री शिंदे यावेळी म्हणाले. २४ एप्रिलपर्यंत हा मेळावा चालणार आहे. तेलंगणा, आंध्रप्रदेश, छत्तीसगड आदी राज्यांमधून सुमारे ५ लाख भाविक या यात्रेत सहभागी होतील, असा अंदाज आहे.
हेही वाचलंत का ?