मुंबई; पुढारी ऑनलाईन : राज्यातील विद्यापीठातील ऑफलाईन पदवी परीक्षांच्या वेळा वाढवण्यात येणार आहेत. ऑफलाईन परीक्षांसाठी प्रती तास 15 मिनिटे वाढीव वेळ देण्याचा निर्णय कुलगुरूंच्या बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण व परीक्षा ऑनलाईन पद्धतीने झाल्यामुळे विद्यार्थ्यांचा लेखनाचा सराव कमी झाल्याने, ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घेताना वेळ वाढवून देण्याची मागणी युवासेनेने केली होती.
ऑफलाईन परीक्षांसाठी प्रती तास 15 मिनिटे वाढीव वेळ देण्याचा निर्णय कुलगुरूंच्या बैठकीत घेण्यात आला असल्याचे सामंत यांनी म्हटले आहे. यामुळे सर्वच विद्यापीठातील परीक्षा देत असलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. यावर्षी दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना वेळ वाढवून दिला होता.
हे ही वाचलं का ?