कल्याण ; पुढारी वृत्तसेवा : कल्याण सेंच्युरी रेऑन कंपनीच्या व्हिस्कोस प्रोडक्शनमध्ये काम करणाऱ्या एका कामगाराचा डिझॉलव्हरमध्ये पडून दुर्दैवी अंत झाला. दरम्यान या घटनेकडे कंपनीकडून बेदखल केल्याचे कामगार संघटना आणि कंपनीचे कर्मचाराऱ्यांनी खंत व्यक्त केली आहे. अनिल कुमार रामनारायण झा (४८) असे मृत कामगाराचे नाव असून तो बिहारचा रहिवासी होता. आज पहाटे ही दुर्घटना घटना घडली.
अनिल कुमार झा हा व्हिस्कोस प्रोडक्शनमध्ये काम करत होता, असे सांगण्यात येत आहे. सकाळी तो डिझॉलवरमध्ये पडलेल्या अवस्थेत आढळून आला. घटनेची माहिती मिळताच एपीआय प्रवीण घुटूगडे घटनास्थळी पोहोचले आणि अग्निशमन दलाच्या मदतीने त्यांची सुटका करण्यात आली. त्यानंतर अनिलला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मृत घोषीत केले.
जितेंद्र सिंग नावाच्या कर्मचाऱ्याने या घटनेची माहिती पोलिसांना दिली असून गुन्हा दाखल केल्यानंतर गुन्हे शाखेचे पीआय जगताप आणि उल्हासनगरचे एपीआय प्रवीण घुटुगडे तपास करत आहेत.
हेही वाचा :