पुणे : कात्रज गंधर्व लॉन्सजवळ शेडमधील तब्बल २० सिलेंडरचा स्फोट | पुढारी

पुणे : कात्रज गंधर्व लॉन्सजवळ शेडमधील तब्बल २० सिलेंडरचा स्फोट

पुणे, पुढारी वृत्तसेवा : कात्रज गंधर्व लॉन्सजवळील सुंदा माता मंदिराच्या जवळ एका पाठोपाठ एक अशा २० सिलेंडरचा स्फोट झाला. या घटनेची माहिती अग्शिनशामक दलाला दुपारी मिळाली. त्यानंतर दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

दरम्‍यान, या ठिकाणी सिलेंडरचे गोडाऊन असल्याबाबतची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास ही घटना समोर आली आहे. या घटनेत सिलेंडरचा स्फोट होऊन आगीचे दूरवर हवेत भडके दिसत आहेत. सिलेंडरचे होणारे स्फोट पाहून स्थानिक नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. अद्याप स्‍फोटाचे कारण समजू शकले नाही. तसेच प्राथमिक माहितीनुसार कोणतीही जिवीत हाणी झालेली नसल्याचे अग्निशमन दलातील अधिकार्‍यांनी सांगितले.

हेही वाचलं का  

Back to top button