संजय राऊत : ‘राज्यपाल सत्ताधाऱ्यांना टार्गेट करतात, याचा अर्थ तुम्ही समजून घ्या’

Sanjay Raut www.pudhari.news
Sanjay Raut www.pudhari.news
Published on
Updated on

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : केंद्र सरकार सुडाच्या भावनेने कारवाई करत आहे. राज्य सरकार तसं काही करत नाही. असं करायचं असेल तर त्यासाठी प्रशिक्षण घ्यावं लागेल, असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपला लगावला. पण, महाराष्ट्र सरकार असं काही करणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. ते गुरूवारी (दि. २४) नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले की, महाराष्ट्राला चांगल्या नेत्यांची प्रतिष्ठा, परंपरा आहे. सुडाच्या कारवाया सुरू आहेत, असे विरोधीपक्ष नेते कितीही ओरडून सांगत असले, तरी तसं आम्ही करणार नाही. जर आम्हाला सुडाच्या कारवाई करायच्या असतील, तर आम्हाला केंद्रीय तपास यंत्रणांकडून प्रशिक्षण घ्यावं लागेल. पण आम्हाला त्याची आवश्यकता नाही, असंही त्यांनी सांगितले.

श्रीधर पाटणकर यांची संपती जप्त केल्याची माहिती मिळत आहे. पूर्ण माहिती मिळाली की बोलू, असंही राऊत म्हणाले. तेलाच्या किंमती वाढत आहेत. काल संसदेत महागाईवर चर्चा झाली आणि सभागृह चालू दिलं नाही. आता निवडणुका संपल्या, हेच भाजपचं धोरण आहे. चाल आहे. लोक यात फसतात. देशात पुन्हा एकदा महागाईवर एक माहौल बनणार. खरी समस्या रशिया-युक्रेन, हिजाब, काश्मीर फाईल नाही, देशाची खरी समस्या बेरोजगारी आणि महागाई आहे, असेही ते म्हणाले.

मुख्यमंत्री पदाची जबाबदारी घेतल्यानंतर अनेक वेळा आमदारांना जेवायला बोलावलं जाते, ही परंपरा आहे. महाराष्ट्रात आणि बंगालमध्ये राज्यपाल सरकारवर निशाणा साधतात. अनेक राज्यात राज्यपाल आहेत. जिथे भाजपचं सरकार नाही, तेथील राज्यपाल सत्ताधाऱ्यांना टार्गेट करतात. याचा अर्थ तुम्ही समजून घ्या. विदर्भात प्रतिनिधीत्व देण्याबाबत मुख्यमंत्री गांभीर्याने विचार करत आहे. विदर्भाला लवकरंच प्रतिनिधीत्त्व मिळेल, असेही संजय राऊत यांनी सांगितले.

हेही वाचलंत का ? 

पहा व्हिडिओ : कशी घेऊयात कानाची काळजी | how to Care for your Ears Properly

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news