यवतमाळ : बलात्कार प्रकरणी आराेपीला न्यायालयीन कोठडी | पुढारी

यवतमाळ : बलात्कार प्रकरणी आराेपीला न्यायालयीन कोठडी

घाटंजी (जि. यवतमाळ), पुढारी वृत्तसेवा : अल्‍पवयीन पीडितेवर अत्‍याचार प्रकरणातील आराेपी निलेश लक्ष्मण जेंगठे (रा. ससाणी, वय 25)  याच्‍यावर भादंवि कलम 376(2) (j), 376 (2) (I), 376 (3) व बाल लैंगिक अत्याचार अधिनियम 4 अंतर्गत घाटंजी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली असल्याची माहिती पोलिसांनी सांगितले.

याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडिता आजारी पडली. तिला पालकांनी डाॅक्‍टरांकडे नेले.  ती पाच महिन्‍याची गर्भवती असल्याचे समजले.  मुलीसोबत जबरदस्ती करणार्‍याविराेधात कारवाईची मागणी पालकांनी पाेलिसांनी केली.

पीडितीने महिला पोलीस अधिकाऱ्यांसमेर आरोपी निलेश जेंगठेमुळे गर्भधारणा झाल्याचे सांगितले. यानंतर पाेलिसांनी  निलेश जेंगठे याला अटक केली. घाटंजी पोलीस स्टेशनचे ठाणेदार मनीष दिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक किशोर भुजाडे, पोलीस नायक विनोद मेश्राम तपास करीत आहे.

हेही वाचलंत का ?

Back to top button