कल्याण : पोलिसांशी हुज्जत घालत पोलीस चौकी ताब्यात घेण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न ! (video) | पुढारी

कल्याण : पोलिसांशी हुज्जत घालत पोलीस चौकी ताब्यात घेण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न ! (video)

डोंबवली, पुढारी वृत्तसेवा : कल्याणजवळील म्हारळ भागातील पोलीस चौकी शिवसैनिकांनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार आज (बुधवार) घडला. तसेच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी हुज्जत घालत पोलीस चौकीला पक्षाचे झेंडे देखील लावले. या प्रकारामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या सर्व घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

दरम्यान, पोलिसांनी या शिवसैनिकांना रोखत त्यांना बाहेर काढले. या घटनेच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पोलीस चौकी आम्ही बांधून दिली आहे. तुम्हाला दुसऱ्या ठिकणी पोलीस चौकी उभारली गेली आहे. त्यामुळे आता ती आमच्या ताब्यात द्या, त्या ठिकाणी शिवसेनेची शाखा उभारायची आहे, असे व्हिडिओमध्ये बोलताना शिवसैनिक दिसत आहेत.

या व्हिडिओमध्ये शिवसेना शहर प्रमुख सोमनाथ पाटील, नंदू म्हात्रे पोलिसांशी हुज्जत घालताना दिसत आहेत. तर शिवसैनिकांचा चौकी ताब्यात घेण्याचा कोणता प्रयत्न नव्हता. ती चौकी आमच्या पदाधिकाऱ्यांनी २० ते २५ वर्षापूर्वी बांधून दिली होती. आता पोलिसांना नवी पोलीस चौकी मिळाली आहे. त्यामुळे जुन्या पोलीस चौकीची जागा बिल्डरला न देता पुन्हा नागरिकांच्या कामासाठी द्यावी, अशी मागणी यावेळी शिवसैनिकांनी केली.

हेही वाचलंत का ? 

Back to top button