गडचिरोलीत १६ आत्मसमर्पित नक्षल्यांसह ११७ आदिवासी जोडपी विवाहबद्ध | पुढारी

गडचिरोलीत १६ आत्मसमर्पित नक्षल्यांसह ११७ आदिवासी जोडपी विवाहबद्ध

गडचिरोली, पुढारी वृत्तसेवा : जिल्हा पोलीस दल आणि नागपुरच्या मैत्री परिवार संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आज (रविवार) गडचिरोली येथे आदिवासी जोडप्यांचा सामुहिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. यात १६ आत्मसमर्पित नक्षल्यांसह दुर्गम भागातील १११ जोडपी अशी एकूण ११७ आदिवासी जोडपी (Tribal couple) विवाहबद्ध झाली.

विवाहबद्ध झालेल्या जोडप्यांना (Tribal couple) संसारोपयोगी भेटवस्तू देण्यात आल्या. या कार्यक्रमाला आमादर कृष्णा गजबे, आमदार डॉ. देवराव होळी, पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अनुज तारे यांच्यासह मैत्री परिवार संस्थेचे अध्यक्ष प्रा. संजय भेंडे, सचिव प्रमोद पेंडके आदी मान्यवर उपस्थित होते. २०२१ या वर्षात पोलीस दलातर्फे विविध पोलीस ठाणे, उपपोलीस ठाणे आणि पोलीस मदत केंद्र स्तरावर ६८ जोडप्यांचे विवाह लावून देण्यात आले आहेत.

हेही वाचलंत का ? 

पहा व्हिडिओ : चला दख्खनचा राजा जोतिबाचा महिमा ऐकूया : महिमा श्री केदारलिंगाचा…

Back to top button