

लातूर ; पुढारी वृत्तसेवा किल्लारी पोलीस स्टेशन येथे ड्युटीवर असलेले ठाणे अंमलदार एस.एस. सावंत यांनी सुसाईड नोट लिहून स्वतःवर गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना (शनिवार) मध्यरात्री घडली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, शनिवारी रात्री किल्लारी पोलिस स्टेशनला नाईक कृष्णा गायकवाड, मीरा जाधव यांच्यासह पीएसओ कर्मचारी एस. एस सावंत हे ड्युटीवर होते. मध्यरात्री दोन वाजून पंधरा मिनिटांच्या सुमारास सावंत यांनी ठाण्यातील एस एल आर रायफलने हनुवटीच्या खालून गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली. गोळी चालल्याचा आवाज ऐकून पाेलिस नाईक कृष्णा गायकवाड हे घटनास्थळी पोहचले. त्यांनी या घटनेची माहिती पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांना दिली.
एस.एस. सावंत हे २०१७ मध्ये कासार शिरशी ( ता. निलंगा ) पोलीस स्टेशन येथे कार्यरत हाेते. त्यांनी निलंगा तालुक्यातील काही शैक्षणिक संस्था लक व काही राजकीय पक्षांच्या नेत्यांशी आर्थिक व्यवहार केले होते. या लोकांना त्यांनी सुमारे ९ लाख पन्नास हजार रुपये उसने दिले होते. आर्थिक व्यवहार केलेल्या लोकांनी पैसे परत देण्यास टाळाटाळ करून सावंत याना मारहाण व शिवीगाळही केली होती.
"तू ड्युटी कशी करतोस" म्हणून धमकीही दिली होती. तसेच त्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याने धनराज सूर्यवंशी व त्यांचे साथीदार यांच्या त्रासास कंटाळून आपण आत्महत्या करत असल्पोयाचे लीस कर्मचारी एस.एस. सावंत यांनी सुसाईड नोट लिहीले आहे.
सावंत हे मूळचे उस्मानाबाद जिल्ह्यातील समुद्रवाणी येथील रहिवासी असून, तेथेच त्यांचे कुटुंब वास्तव्यास आहे. त्यांच्या कुटुंबियांमध्ये आई, पत्नी व तीन मुली असा परिवार आहे.
हेही वाचलं का?