भंडारा : एसटी कर्मचाऱ्याची आत्महत्या | पुढारी

भंडारा : एसटी कर्मचाऱ्याची आत्महत्या

भंडारा, पुढारी वृत्तसेवा : गळफास घेऊन एसटी कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याची घटना भंडारा तालुक्यातील आंबाडी येथे रविवारी उघडकीस आली. कामाचा ताण आणि नैराश्येतून त्यांनी आत्महत्या केल्याची शक्यता वर्तविली जात आहे.

भिमराज कळंबे (वय-५०) रा. आंबाडी असे एसटी कर्मचाऱ्याचे नाव आहे. ते पवनी आगारात कार्यरत होते. परंतु, एसटी महामंडळात अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे कामाचा ताण वाढला होता. शिवाय नैराश्येतून त्यांनी आत्महत्या केली असावी, अशी शक्यता वर्तविली जात आहे. घटनेची माहिती मिळताच कारधा पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. कळंबे यांच्या आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही.

हेही वाचलं का?

Back to top button