हिंगोली : महिला कर्मचाऱ्यांचा विनयभंग; नवोदय विद्यालयातील क्लार्कला १४ दिवसांची कोठडी | पुढारी

हिंगोली : महिला कर्मचाऱ्यांचा विनयभंग; नवोदय विद्यालयातील क्लार्कला १४ दिवसांची कोठडी

वसमत, पुढारी वृत्तसेवा : येथील जवाहर नवोदय विद्यालयात सहकारी महिला कर्मचाऱ्यांचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी विद्यालयातील ज्युनिअर क्लार्कवर वसमतच्या ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चेरपिलवार यास वसमत न्यायालयात हजर केले असता त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येथील जवाहर नवोदय विद्यालयात विजय संभाजी चेरपिलवार हा ज्युनिअर क्लार्क म्हणून कार्यरत आहे. मागील चार महिन्यांपासून विजय चेरपिलवार हा सहकारी क्लार्क असलेल्या महिला कर्मचाऱ्यांचा पाठलाग करीत होता. तसेच २८ फेब्रुवारी २०२२ रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास फिर्यादीच्या हाताला धरुन ओढले. तसेच वाईट हेतूने अश्लील बोलून शिवीगाळ, छेडछाड करून विनयभंग केला.

या प्रकरणी पीडित महिला कर्मचाऱ्याच्या तक्रारीवरून ग्रामीण पोलीस ठाण्यात संशयित आरोपी विजय चेरपिलवार याच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला असून त्याला १४ दिवसांची कोठडी न्यायालयाने सुनावली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक विलास चवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे करीत आहेत.

हेही वाचलंत का ? 

पहा व्हिडिओ : “महिलांनी राजकारणात आलं पाहिजे” – खा. प्रियांका चतुर्वेदी | International Women’s Day 2022

Back to top button