Sharmaji Namkeen : ऋषी कपूर यांच्या निधनानंतर २ वर्षांनी येणार त्यांचा शेवटचा चित्रपट | पुढारी

Sharmaji Namkeen : ऋषी कपूर यांच्या निधनानंतर २ वर्षांनी येणार त्यांचा शेवटचा चित्रपट

पुढारी ऑनलाईन डेस्क : दिवंगत बॉलिवूड स्टार ऋषी कपूर यांच्या ‘शर्माजी नमकीन’ (Sharmaji Namkeen) या चित्रपटाची रिलीज डेट समोर आलीय. अभिनेता ऋषी कपूरचा हा शेवटचा चित्रपट मोठ्या पडद्यावर येणार आहे.(Sharmaji Namkeen) ३१ मार्चला ओटीटीवर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. हितेश भाटिया दिग्दर्शित या चित्रपटात परेश रावल यांच्यासह जुही चावला, सुहेल नय्यर, तारुक रैना, सतीश कौशिक, शीबा चड्ढा आणि ईशा तलवार यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

फरहान अख्तरने इन्स्टाग्रामवर चित्रपटाचे पोस्टर शेअर करत लिहिले की, ‘शर्माजी येत आहेत, आपण आयुष्यात तडका लावायला.’ वर्ल्ड प्रीमियर ३१ मार्च रोजी होणार आहे. प्रेक्षकांना हा चित्रपट अॅमेझॉन प्राईम व्हिडिओवर पाहता येणार आहे.

शर्माजी नमकीन ही एका सेवानिवृत्त व्यक्तीची कथा आहे. हा चित्रपट खास असेल. महिलांच्या किटी सर्कलमध्ये सहभाग घेतल्यानंतर स्वयंपाकावेळी त्याला आपल्या कौशल्याबद्दल कळतं.या चित्रपटात दोन दिग्गज अभिनेते ऋषी कपूर आणि परेश रावल एकच भूमिका साकारताना दिसणार आहेत. या चित्रपटाचे शूटिंग सुरू असताना ऋषी कपूर यांची तब्येत बिघडली होती. त्यामुळे त्यांनी उर्वरित चित्रपटाचे शूटिंग केले नाही. चित्रपटात दोन कलाकार एकाच व्यक्तिरेखा साकारण्याची ही पहिलीच वेळ असेल.

ऋषी कपूर दीर्घकाळापासून कॅन्सरशी संघर्ष करत होते. ३० एप्रिल, २०२० रोजी त्यांचे निधन झाले. वयाच्या ६७ व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या आकस्मिक निधनानंतर, निर्मात्यांनी चित्रपटाचे उर्वरित भाग पूर्ण करण्यासाठी अभिनेते परेश रावल यांना चित्रपटात घेतले. ऋषी कपूर यांच्या निधनानंतर जवळपास २ वर्षांनी हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Farhan Akhtar (@faroutakhtar)

 

View this post on Instagram

 

A post shared by Ritesh Sidhwani (@ritesh_sid)

Back to top button