नागपूर : ‘शालांत परीक्षा’ आंदोलनाला ४० शाळा व्‍यवस्‍थापनांचा पाठिंबा | पुढारी

नागपूर : ‘शालांत परीक्षा’ आंदोलनाला ४० शाळा व्‍यवस्‍थापनांचा पाठिंबा

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : नागपूर व परिसरातील जवळपास ४० शाळा व्‍यवस्‍थापनांनी दहावी व बारावीच्‍या परीक्षांसाठी शाळा इमारती व इतर सुविधा उपलब्‍ध न करून देण्‍याचा निर्णय निर्णय घेतला आहे. महाराष्‍ट्र राज्‍य शिक्षण संस्‍था महामंडळाने उभारलेल्‍या त्‍यासंदर्भातील आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. सोमवार, १४ फेब्रुवारी रोजी याच संदर्भात शाळा मुख्‍याध्‍यापकांची बैठक होणार असून त्‍या आंदोलनात सहभागी होण्‍यासंदर्भात निर्णय घेतला जाणार आहे.

महाराष्‍ट्र राज्‍य श‍िक्षण संस्‍था महामंडळाचे कार्याध्‍यक्ष विनोद गुडधे पाटील यांच्‍या अध्‍यक्षतेत शुक्रवारी सेवासदन, सीताबर्डी येथे शाळा व्‍यवस्‍थापन प्रतिनिधींची बैठक घेण्‍यात आली. महामंडळाचे सरकार्यवाह रवींद्र फडणवीस, सेवासदन संस्‍थेचे उपाध्‍यक्ष बापू भागवत, ढोक सर इत्‍यादी मान्‍यवर बैठकीला उपस्‍थ‍ित होते.

शाळांना शासनाकडून मागील अनेक वर्षांपासून वेतन अनुदान मिळत नसून त्‍यामुळे शाळा अडचणीत आल्‍या आहेत. या संस्‍थानी शासनाला अनेकदा निवेदन दिले आहे तसेच आंदोलनेही केले. परंतु त्‍याचा काहीच फायदा झाला नाही. त्‍यामुळे महामंडळाने आंदोलनाचा पवित्रा घेतला असल्‍याचे रवींद्र फडणवीस यांनी सांगितले.

शाळा मुख्‍याध्‍यापकांची बैठक

‘शालांत परीक्षा’ आंदोलनासंदर्भात सोमवार, १४ फेब्रुवारी रोजी शाळा मुख्‍याध्‍यापकांची सभा धीरन कन्‍या शाळा, सीताबर्डी येथे दुपारी ३ वाजता आयोजित करण्‍यात आली आहे. या सभेला सर्व शाळांच्‍या मुख्‍याध्‍यापकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन महाराष्‍ट्र राज्‍य श‍िक्षण संस्‍था महामंडळाचे सरकार्यवाह रवींद्र फडणवीस यांनी केले आहे.

हे ही वाचलं का  

Back to top button