नाशिक : बसने चिरडल्याने विद्यार्थिनीचा मृत्यू | पुढारी

नाशिक : बसने चिरडल्याने विद्यार्थिनीचा मृत्यू

नाशिक, पुढारी वृत्तसेवा : नाशिकमधील जुने सीबीएस परिसरात बस स्थानकातून निघालेल्या नाशिक-नंदुरबार (एमएच १५ बीएल ३४४५) या बसखाली 21 वर्षीय विद्यार्थिनी सापडून मृत्यू झाल्याची घटना घडली. वैशाली गायकवाड असे या विद्यार्थिनीने नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकहून नंदुरबारकडे जाणारी बस जुन्या सीबीएसवरून नंदुरबारला निघाली होती. याचवेळी वैशाली सिग्नलवर रस्ता ओलांडत होती. या दरम्यान ती बसच्या चाकाखाली आल्याने गंभीर जखमी झाली. त्‍यानंतर तत्‍काळ जखमी अवस्थेत नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्‍यान तिचा मृत्यू झाला. या दुदैवी घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

हे ही वाचलं का  

Back to top button