

कार्ला : पुढारी वृत्तसेवा : कामशेतजवळील वाडिवळे येथील इंद्रायणी नदी व कुंडलिका नदी संगमावर असलेल्या श्री क्षेत्र संगमेश्वर मंदिरातील शिवलिंग जीर्णोद्धार तसेच मंदिर कलशारोहण सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला.
सुमारे शंभर वर्षांपूर्वी महान संत श्रीमहंत स्वामी कामेश्वरानंद गिरीजी महाराज यांच्या हस्ते शिवलिंग जीर्णोद्धार करण्यात आला होता.
आता महाशिवरात्री उत्सवापूर्वी नाशिक त्र्यंबकेश्वर येथील महान संत मोनी बाबा व गुरुवर्य शिवानंद महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली वाडिवळे ग्रामस्थांच्या वतिने
जीर्णोद्धार व शिवलिंग प्राणप्रतिष्ठा, शिवलिंग, नंदीभगवान, पार्वती माता मंदिराची वास्तुशांती व ध्वजस्थापन तसेच कलशरोहन सोहळा पार पडला.यावेळी गावातील जोडप्यांच्या हस्ते होम हवन व विधिवत पूजा करण्यात आली.
https://youtu.be/gfZJcopVz0g
वाडिवळे येथे श्री क्षेत्र संगमेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार व कलशारोहण सोहळा.