नागपूर : महापालिकेच्‍या ऑनलाईन सभेत नगरसेवकाने चक्क ओढली सिगारेट ! | पुढारी

नागपूर : महापालिकेच्‍या ऑनलाईन सभेत नगरसेवकाने चक्क ओढली सिगारेट !

नागपूर, पुढारी वृत्तसेवा

नागपूरमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नागपूर महापालिकेच्या ऑनलाईन सभेत नगरेवकाने चक्क सिगारेट ओढली. सिगारेट ओढत असतानाचा नगरसेवकाचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. त्यानंतर व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या नगरसेवकावर सर्व स्तरातून जोरदार टीका होत आहे. रमेश पुणेकर असे या नगरसेवकाचे नाव असून, पुणेकर हे काँग्रेसचे नगरसेवक आहेत.

आज नागपूर महापालिकेची ऑनलाईन सभा पार पडली. या सभेवेळी महापौर, महापालिका आयुक्त आणि इतर नगरसेवकांची उपस्थिती होती. शहरातील विविध समस्यांवर चर्चा करण्यासाठी या सभेचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील समस्यांवर चर्चा करत असताना काँग्रेसचे नगरसेवक रमेश पुणेकर हे सिगारेट पित असल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.दरम्यान पुणेकर यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अशा सभेमध्ये सिगारेट पिणे योग्य आहे का? भर सभेत सिगारेट पिणाऱ्या नगरसेवकांना शहरातील समस्यांचे भान नाही का? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

हेही वाचलं का? 

Back to top button