गडचिरोली : लोहप्रकल्प कंपनीच्या संचालकास मारहाण प्रकरणात आमदाराच्या जावयासह ६ जणांवर गुन्हे दाखल - पुढारी

गडचिरोली : लोहप्रकल्प कंपनीच्या संचालकास मारहाण प्रकरणात आमदाराच्या जावयासह ६ जणांवर गुन्हे दाखल

गडचिरोली, पुढारी ऑनलाईल : एटापल्ली येथील सुरजागड लोहप्रकल्पाचे काम करणाऱ्या त्रिवेणी अर्थमूव्हर्स कंपनीच्या संचालकास मारहाण केल्याप्रकरणी अहेरी पोलिसांनी अहेरीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांचे जावई ऋतुराज हलगेकर यांच्यासह सहा जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.

त्रिवेणी अर्थमूव्हर्स कंपनीचे संचालक अतुल खाडिलकर हे २४ जानेवारीला आलापल्ली येथील कंपनीच्या गेस्ट हाऊसमध्ये झोपले असताना मध्यरात्री ऋतुराज हलगेकर, जयराज हलगेकर, भोजराज, जेडी नामक इसम आणि त्यांच्या अन्य सहकाऱ्यांनी गेस्ट हाऊसच्या खोलीचे दार तोडून आज प्रवेश केला. त्यानंतर अतुल खाडिलकर यांना लाथाबुक्यांनी मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिली.

तसेच, यासंदर्भात खाडिलकर यांनी लेखी तक्रार केल्यानंतर अहेरी पोलिसांनी ऋतुराज हलगेकर, जयराज हलगेकर, भोजराज, जेडी व अन्य दोघांवर भादंवि ४५२, ३२३, १४३, १४७, ५०४, ५०६ व ४२७ अन्वये गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणी आरोपींना चौकशीसाठी बोलावण्यात येणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक गव्हाणे यांनी दिली.

हे ही वाचलं का 

Back to top button