गुन्हेविश्व : भाजपच्या माजी नगसेवकाने दिलेल्या खूनाच्या सुपारीचा डाव फसला - पुढारी

गुन्हेविश्व : भाजपच्या माजी नगसेवकाने दिलेल्या खूनाच्या सुपारीचा डाव फसला

पुणे, पुढारी वृत्तसेवा : २०१६ मध्ये पुर्ववैमन्सातून गणपती विसर्जनाच्यावेळी भाजपचे माजी नगरसेवक विवेक महादेव यादव यांच्यावर गोळीबार झाला होता. त्याचा बदल घेण्यासाठी कारागृहातून सुटलेल्या सराईत गुन्हागारांना विरोधक बबलू गवळीच्या खुनाची सुपारी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. पुण्याचे गुन्हेविश्व पुन्हा चर्चेत आले आहे.

संबंधित दोन गुन्हागारांना अटक केल्यानंतर पोलिसांनी ही माहिती मिळाली. या सुपारी किलर्सकडून ३ गावठी पिस्तूले, जिवंत काडतूसे आणि सुपारी स्वरुपात दिलेली दीड लाखाची रोकड कोंढवा पोलिसांनी जप्त केली आहे. या घटनेमुळे शहरासह राजकीय वर्तुळ आणि पुणे गुन्हेविश्व हादरले आहे.

राजन जॉन राजमनी (रा. भाग्योदयनगर, कोंढवा) आणि त्याचा मित्र ईब्राहिम उर्फ हुसेन याकुब शेख (रा. काळा खडक वाकड) तसेच मांडवली करून हत्यारे व रोकड पुरविणाऱ्यावर कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपच्या माजी नगरसेवकाने केलेल्या खुनाच्या कटाचा तपास पोलिस करत आहेत.

राजमनी व इब्राहिम या दोघांना पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत महत्वाचे धागेदोरे हाती लागले आहेत. त्या धाग्यादोऱ्यांमुळे नगरसेवक विवेक यादव याचा थेट संबंध असल्याचे पुरावेच पोलिसांच्या हाती लागले आहेत.

गुन्ह्यातील महत्वाचे मुद्दे 

  • दोघा सुपारी किलरला पकडल्यानंतर झाला उलगडा
  • व्हाट्सअप संभाषणातून धक्कादायक गोष्टी समोर
  • कारागृहातून बाहेर आलेल्या सराईतांना दिली होती सुपारी
  • तीन पिस्तूले, दिड लाखाची रोकड आणि काडतूसे जप्त

पहा व्हिडीओ : म्हातारपाखाडी, २०० वर्षे जुन्या घरांचं मुंबईतलं गाव

हे वाचलंत का? 

Back to top button