Titwala GR Patil School: परीक्षेच्या तोंडावर शाळा, मुख्याध्यापकांचे कार्यालयही सील; 1.28 कोटी कर थकबाकीमुळे प्रशासनाची कठोर कारवाई

550 हून अधिक विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह
Titwala GR Patil School
Titwala GR Patil SchoolPudhari
Published on
Updated on

टिटवाळा : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या मालमत्ता कर वसूली विभागाने थकबाकीदारांविरोधात सुरू केलेल्या धडक मोहिमेत टिटवाळ्यातील जी.आर. पाटील माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेजवर कठोर कारवाई करत शाळेचे तसेच मुख्याध्यापकांचे कार्यालय सील केले. तब्बल 1 कोटी 28 लाख रुपयांहून अधिक मालमत्ता कर थकवल्याने ही कारवाई करण्यात आल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली असून परीक्षेच्या तोंडावर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रक्रियेवर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.

Titwala GR Patil School
Maharashtra Assistant Professor Recruitment: राज्यात सहायक प्राध्यापकांच्या 5,012 रिक्त पदांना मंजुरी; लवकरच भरती प्रक्रिया सुरू

महापालिकेच्या कर वसूली पथकाने अचानक शाळेत दाखल होत कारवाई केली. शाळा व्यवस्थापनाने विश्वस्तांचे कार्यालय सील करण्याची विनंती प्रशासनाकडे केली होती; मात्र ती नाकारत प्रशासनाने थेट शाळेचे आणि मुख्याध्यापकांचे कार्यालय सील केले. या कार्यालयांमध्ये दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांची महत्त्वाची कागदपत्रे असल्याने शैक्षणिक कामकाज ठप्प होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या शाळेत विद्यार्थ्यांच्या तोंडी परीक्षा सुरू असताना ही कारवाई करण्यात आल्याने पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. परीक्षा कालावधीत कारवाई टाळायला हवी होती, अशी भावना संबंधितांकडून व्यक्त होत असताना, वेळेत कर थकबाकी भरली असती तर कारवाईची वेळ आली नसती, अशी भूमिका प्रशासनाने स्पष्ट केली आहे.

Titwala GR Patil School
Vijay Mallya High Court: भारतात परतण्याचा हेतू आहे की, नाही; आम्ही शेवटची संधी देतोय; विजय मल्ल्या यांना हायकोर्टाचा इशारा

महापालिकेच्या महसूल व्यवस्थेचा मुख्य आधार असलेला मालमत्ता कर वसूल करण्यासाठी प्रशासनाने चालू आर्थिक वर्षात मोठे उद्दिष्ट ठेवले असून थकबाकीदारांविरोधात कठोर पावले उचलण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. महापालिका हद्दीत हजारो कोटींची कर थकबाकी प्रलंबित असल्याने कर न भरणाऱ्या मालमत्तांवर सील आणि लिलावाची कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.

Titwala GR Patil School
Mumbai University Exams: मुंबई विद्यापीठाचा मोठा निर्णय : 304 परीक्षा कायमस्वरूपी बंद

ही कारवाई उपायुक्त (कर) बाळासाहेब चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या थकबाकीबाबत वारंवार नोटिसा देऊनही प्रतिसाद न मिळाल्याने अखेर कठोर निर्णय घेण्यात आल्याची माहिती कर अधीक्षक जयराम शिंदे यांनी दिली. विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घेऊनच कारवाई करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Titwala GR Patil School
Delimitation Commission Maharashtra: प्रभागरचनेतील राजकीय हस्तक्षेप रोखण्यासाठी स्वायत्त सीमांकन आयोगाचा प्रस्ताव

कारवाईचा परिणाम विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर होणार

एकूण देयकात मोठी वाढ झाल्याचेही समोर आले आहे. अनेक नोटिसांनंतरही कर न भरल्याने कारवाई अपरिहार्य ठरल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. दुसरीकडे, या संस्थेत सुमारे 550 हून अधिक आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थी शिक्षण घेत असल्याने मानवी दृष्टिकोनातून निर्णय घ्यावा, अशी मागणी शाळा व्यवस्थापनाकडून करण्यात आली आहे. या घटनेमुळे टिटवाळा परिसरात मोठी चर्चा रंगली असून कर वसुलीसाठी महापालिकेची कठोर भूमिका अधोरेखित झाली आहे. मात्र या कारवाईचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यावर होणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news