Maharashtra Assistant Professor Recruitment: राज्यात सहायक प्राध्यापकांच्या 5,012 रिक्त पदांना मंजुरी; लवकरच भरती प्रक्रिया सुरू

अनुदानित महाविद्यालयांना दिलासा; दीर्घकाळ प्रलंबित भरतीला अखेर हिरवा कंदील
Maharashtra Assistant Professor Recruitment: राज्यात सहायक प्राध्यापकांच्या 5,012 रिक्त पदांना मंजुरी; लवकरच भरती प्रक्रिया सुरू
Published on
Updated on

मुंबई : राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांशी संलग्न असलेल्या मान्यताप्राप्त अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमधील सहायक प्राध्यापक संवर्गातील 5,012 रिक्त पदे भरण्यास शासनाने मान्यता दिली आहे.

Maharashtra Assistant Professor Recruitment: राज्यात सहायक प्राध्यापकांच्या 5,012 रिक्त पदांना मंजुरी; लवकरच भरती प्रक्रिया सुरू
Vijay Mallya High Court: भारतात परतण्याचा हेतू आहे की, नाही; आम्ही शेवटची संधी देतोय; विजय मल्ल्या यांना हायकोर्टाचा इशारा

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सुरू असताना विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी आणि विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) निर्देशांनुसार प्राध्यापकांची रिक्त पदे भरणे आवश्यक होते. त्याच पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

Maharashtra Assistant Professor Recruitment: राज्यात सहायक प्राध्यापकांच्या 5,012 रिक्त पदांना मंजुरी; लवकरच भरती प्रक्रिया सुरू
Mumbai University Exams: मुंबई विद्यापीठाचा मोठा निर्णय : 304 परीक्षा कायमस्वरूपी बंद

भरती प्रक्रियेबाबत शासनाने काही महत्त्वाच्या अटी व शर्ती निश्चित केल्या आहेत. या अंतर्गत 1 ऑक्टोबर 2025 रोजीच्या विद्यार्थी संख्येनुसार निश्चित झालेल्या कार्यभाराच्या आधारे ही 5 हजार 12 पदे भरली जाणार आहेत. संपूर्ण भरती प्रक्रिया पारदर्शक आणि निश्चित कालमर्यादेत पार पाडण्याची जबाबदारी उच्च शिक्षण संचालक (पुणे) तसेच विभागीय सहसंचालकांवर सोपविण्यात आली आहे, असेही ते म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news