Bhiwandi Mayor Election 2026: भिवंडी महापौर निवडणुकीत ट्विस्ट; भाजपने ऐनवेळी उमेदवार बदलला

नारायण चौधरी नाराज, स्नेहा मेहुल पाटील अधिकृत उमेदवार; विलास पाटील न्यायालयीन कोठडीतून मतदानासाठी हजर
Bhiwandi Municipal Corporation
Bhiwandi Municipal CorporationPudhari
Published on
Updated on

भिवंडी : भिवंडी महापालिका महापौर पदाच्या निवडणुकीला वेगळेच वळण मिळाले असून महापौरपदाच्या निवडणुकीच्या तोंडावरच भाजपने आपला उमेदवार बदलला आहे. त्यामुळे राज्यभरातून नागरीकांच्या नजरा भिवंडी महापौर निवडीकडे लागल्या आहेत.

Bhiwandi Municipal Corporation
Dombivli Fake Medicine Case: डोंबिवलीत बनावट रक्तदाबाच्या औषधांचा भांडाफोड; 8.94 लाखांचा साठा जप्त

भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी शहराध्यक्ष रवी सावंत यांना पत्र देऊन नारायण चौधरी यांना भाजपचे महापौर पदाचा अधिकृत उमेदवार म्हणून घोषित केले होते. नारायण चौधरी यांनी भाजपकडून महापौर पदासाठीचा आपला उमेदवारी अर्ज देखील दाखल केला आहे. मात्र महापौर पदाच्या निवडणुकीला बुधवारी वेगळेच वळण लागले असून, बुधवारी (18) रोजी भाजपचे भिवंडी शहर अध्यक्ष रविकांत सावंत यांनी महापौर पदाच्या उमेदवार म्हणून स्नेहा मेहुल पाटील यांच्या नावाची घोषणा केली आहे. त्यासंदर्भातील लेखी पत्र भाजप शहराध्यक्षांनी भाजपच्या सर्व नगरसेवकांना दिले आहे. भाजपने आता स्नेहा मेहुल पाटील यांची महापौरपदाची अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर

Bhiwandi Municipal Corporation
Rahul Gandhi RSS Defamation: आरएसएस मानहानी : राहुल गांधी शनिवारी भिवंडी न्यायालयात हजर होणार

केले आहे, अशी प्रतिक्रिया भाजप शहराध्यक्ष रविकांत सावंत यांनी दिली आहे. या घडामोडी नंतर भाजपने उमेदवारी घोषित केलेले नारायण चौधरी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मला भाजपने महापौर पदाचा उमेदवार जाहीर केला होता.मात्र महायुतीतील घटक पक्ष सोबत यायला तयार नव्हते.त्यांच्याशी अनेक वेळा बैठका केल्या मात्र घटक पक्ष सोबत येत नाही. त्यातच आज भाजपने स्नेहा मेहुल पाटील यांना महापौरपदाचे उमेदवार घोषित केले. त्यामुळे मी नाराज होऊन सेक्युलर सोबत जाण्याचा निर्णय घेत असल्याचे नारायण चौधरी यांनी स्पष्ट केले आहे.

नव्या समीकरणानुसार भाजपा नाराज नारायण चौधरी महापौर,काँग्रेसचे तारिक मोमिन उपमहापौर पदाचे उमेदवार राहण्याची शक्यता आहे. तर सोबत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) पक्षाच्या वाट्याला स्थायी समिती सभापती पद येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Bhiwandi Municipal Corporation
Thane Wagle Estate Building Slab Collapse: वागळे इस्टेटमध्ये 3 पाचव्या मजल्याचा स्लॅब कोसळला

सर्व पक्ष फोडणाऱ्या भाजपला काँग्रेसने लावले गळाला...

आजपर्यंत सर्वच पक्षामध्ये फोडाफोडीचे राजकारण भाजपाकडून राबवण्यात आले.पण भिवंडीत सर्वाधिक सदस्य निवडून आलेल्या काँग्रेस पक्षाने सत्ता स्थापनेसाठी भाजपा सोबत हातमिळवणी केली असून भाजपामधील एका गटाला आपल्या गळाला लावले आहे. याची खमंग चर्चा भिवंडी शहरात सुरू झाली आहे.

Bhiwandi Municipal Corporation
Wada Police Recruitment: पोलीस भरतीत अपात्र ठरल्याच्या धक्क्यातून तरुणीची विहिरीमध्ये उडी

विलास पाटील यांना न्यायालयीन कोठडी; मतदानासाठी पोलीस बंदोबस्तात आणणार

भिवंडी : भिवंडी पालिका महापौर पदाच्या निवडणुकीतील प्रबळ दावेदार म्हणून ओळखले गेलेले कोणार्क विकास आघाडीचे विलास पाटील यांना मंगळवारी (18) रोजी भिवंडी सत्र न्यायालयाने न्यायालयीन कोठडी ठोठावली आहे.शुक्रवार ( 13) रोजी रात्री उशिरा ठाणे आर्थिक गुन्हे शाखेने विलास पाटील यांना एका आर्थिक फसवणूक व्यवहार प्रकरणी ताब्यात घेतले होते. शनिवारी सुट्टीच्या न्यायालयात त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी ठोठावली होती. दरम्यान, 16 फेब्रुवारी रोजी विलास पाटील

Bhiwandi Municipal Corporation
Mira Bhayander Tipu Sultan Chowk: मिरा-भाईंदरमध्ये टिपू सुलतान चौक नामांतरावरून राजकारण तापले

महापौर पदाच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी न्यायालयाच्या परवानगीने पोलिस बंदोबस्तात आले होते. मंगळवारी विलास पाटील यांना न्यायालयात हजर न करता ऑनलाइन झालेल्या सुनावणीत त्यांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. यावर पुढील सुनावणी 21 फेब्रुवारी होणार असल्याची माहिती विलास पाटील यांचे वकील अँड.नारायण अय्यर यांनी दिली असून,20 फेब्रुवारी रोजी पालिका महापौर पदाच्या निवडणुकीसाठी सकाळी 11 ते 3 वाजता दरम्यान त्यांना पोलिस बंदोबस्तातून पालिकेत घेऊन येण्याची मुभा दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news