Wada Police Recruitment: पोलीस भरतीत अपात्र ठरल्याच्या धक्क्यातून तरुणीची विहिरीमध्ये उडी

वाडा तालुक्यातील लखमापूरमध्ये विहिरीत उडी; उंची कमी पडल्याने अपात्र ठरल्यानंतर नैराश्य
Girl Death
Girl DeathFile Photo
Published on
Updated on

वाडा : वाडा तालुक्यातील लखमापुर या गावात एका वीस वर्षीय तरुणीने विहिरीमध्ये उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. धक्कादायक म्हणजे ही तरुणी पोलीस भरतीसाठी गेली असता अपात्रतेतून आलेल्या नैराश्यात तिने हे टोकाचे पाऊल उचलले असून या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.

Girl Death
Mira Bhayander Tipu Sultan Chowk: मिरा-भाईंदरमध्ये टिपू सुलतान चौक नामांतरावरून राजकारण तापले

लखमापूर गावातील रुचिता संतोष पाटील ही तरुणी मागील अनेक दिवसांपासून पोलीस भरतीचा सराव करत होती. 14 फेब्रुवारी रोजी ती मुंबई पोलीस दलात सुरू असलेल्या भरतीसाठी गेलीअसता या भरतीमध्ये उंची कमी पडल्याने ती अपात्र झाली होती. वडिलांना मात्र तिने आपल्याला 43 गुण मिळाल्याची खोटी माहिती दिली होती. आपण दिलेली माहिती चुकीची असून आपण अपात्र झाल्याचे लवकरच घरी समजेल या भीतीने व यातून आलेल्या नैराश्यात मंगळवारी दुपारच्या सुमारास गावानजीक असलेल्या एका विहिरीत तिने उडी घेऊन आत्महत्या केली.

Girl Death
Ambernath Chemical Gas Leak: अंबरनाथमध्ये पुन्हा विषारी केमिकल गॅसचा फैलाव; नागरिक संतप्त, प्रशासनावर प्रश्नचिन्ह

गावातील एका नागरिकाने हा प्रकार तिच्या घरी सांगितला मात्र तोपर्यंत खूप उशीर झाल्याने रुचिता हिचा मृतदेह हाती आला. वाडा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनानंतर वाडा पोलिसांनी या घटनेची नोंद केली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित साबळे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत. तरुणीने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत हा प्रकार नमूद असल्याचे साबळे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news