Thane Wagle Estate Building Slab Collapse: वागळे इस्टेटमध्ये 3 पाचव्या मजल्याचा स्लॅब कोसळला

वागळे इस्टेटमध्ये 35 वर्षे जुनी इमारत हादरली; पाचव्या मजल्याचा स्लॅब कोसळला
Thane Wagle Estate Building Slab Collapse
Thane Wagle Estate Building Slab CollapsePudhari
Published on
Updated on

ठाणे : ठाण्याच्या वागळे इस्टेट परिसरातील 35 वर्ष जुन्या असलेल्या नीलम अपार्टमेंटच्या पाचव्या माळ्यावरील प्लॅट क्र 501 मधील सिलिंगचे प्लास्टर अचानक पडून या घटनेत तिघेजण जखमी झाले आहेत. या घटनेत तिघेजण जखमी झाले असून त्यांच्यावर गंगुबाई शिंदे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेले आहे, त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. दुर्घटनाग्रस्त इमारत पूर्णतः रिकामी करण्यात आलेली आहे. सदर इमारत ही सी-2 बी प्रवर्गातील असल्याची माहिती ठाणे महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.

Thane Wagle Estate Building Slab Collapse
Wada Police Recruitment: पोलीस भरतीत अपात्र ठरल्याच्या धक्क्यातून तरुणीची विहिरीमध्ये उडी

वागळे इस्टेट, शांतीनगर परिसरात एका इमारतीचा स्लॅब कोसळल्याची माहिती मंगळवारी पहाटे तीन वाजून 7 मिनिटांनी मिळताच, घटनास्थळी ठाणे महापालिका अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन कक्ष,पोलिस यांनी धाव घेतली. तत्काळ जखमींना स्व. गंगुबाई संभाजी शिंदे रुग्णालयामध्ये उपचाराकरिता दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर 501 रूम हा गजेंद्र प्रसाद यांच्या तर 402 रूम हा यादव यांच्या मालकीचा आहे. त्या घरातील तिघे जण जखमी झाले आहेत. गजेंद्र प्रसाद (वय 60),

Thane Wagle Estate Building Slab Collapse
Mira Bhayander Tipu Sultan Chowk: मिरा-भाईंदरमध्ये टिपू सुलतान चौक नामांतरावरून राजकारण तापले

प्रिन्स यादव ( वय 25) आणि प्रदीप यादव (वय 23) असे तिघे जमखी झाले आहेत. गजेंद्र हे 5व्या मजल्यावरील रूम नंबर 501 मध्ये राहतात, तर यादव बंधू हे 4 थ्या मजल्यावरती रूम नंबर 402 मध्ये राहतात. गजेंद्र यांच्या उजव्या खांद्याला फ्रॅक्चर व शरीराला दुखापत झाली आहे. तर प्रिन्स यांच्या उजव्या पायाला फ्रॅक्चर व शरीराला दुखापत आहे. तसेच प्रदीप यांच्या दोन्ही पायांना व शरीराला दुखापत असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना मुंबईतील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

Thane Wagle Estate Building Slab Collapse
Ambernath Chemical Gas Leak: अंबरनाथमध्ये पुन्हा विषारी केमिकल गॅसचा फैलाव; नागरिक संतप्त, प्रशासनावर प्रश्नचिन्ह

विंग पूर्णपणे सीलबंद

सदर तळ अधिक 5 मजली असलेली नूतन नीलम अपार्टमेंट या इमारतीचे बांधकाम हे 30 ते 35 वर्षे जुने आहे. तसेच ती सी 2 बी प्रवर्गातील असून त्या इमारतीत 26 रूम आहेत. त्यामध्ये 85 ते 95 वास्तव्यास आहेत. या घटनेनंतर ए आणि बी विंग सुरक्षेच्या दृष्टीने रिकाम्या करून त्या राहिवाशांची तात्पुरती व्यवस्था ठामपा शाळा क्रमांक 38 मध्ये करण्यात आली आहे. तर उर्वरित बांधकाम धोकादायक स्थितीत असल्याने त्या इमारतीच्या दोन्ही विंग पूर्णपणे सीलबंद केल्या असून, पुढील कार्यवाही ठामपा बांधकाम विभागाकडून करण्यात येत असल्याचे आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news