Maratha Reservation | मराठा आरक्षण : ठाण्यात उपोषणास परवानगी नाकारली तरी आंदोलन सुरूच | पुढारी

Maratha Reservation | मराठा आरक्षण : ठाण्यात उपोषणास परवानगी नाकारली तरी आंदोलन सुरूच

ठाणे : पुढारी वृत्तसेवा, मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीकरिता जालना येथील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी २५ ऑक्टोबरपासून आमरण उपोषण सुरू केले. या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आजपासून ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकल मराठा समाजाने साखळी उपोषण सुरू केले आहे. पण या उपोषणास अद्याप पोलिसांनी परवानगी दिलेली नाही. (Maratha Reservation)

संबंधित बातम्या 

मुख्यमंत्री यांच्या निवस्थानाबाहेर साखळी उपोषण करण्याची परवानगी पोलिसांनी नाकारल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ही उपोषण करण्यास पोलिसांनी लेखी परवानगी अद्याप दिलेली नाही. तरीदेखील सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी सकाळपासून साखळी उपोषण सुरू केले आहे.

आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, एकच लक्ष मराठा आरक्षण, आरक्षण… अशा घोषणा देत परिसर दुमदुमून सोडला. या उपोषणासाठी ठाणे, कळवा येथील मराठा आले. सकाळपासून पोलिसांची धावपळ सुरू झाली आहे. शुक्रवारी संध्याकाळी काही आंदोलनकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवस्थानाबाहेरच जोरदार घोषणाबाजी केली होती. त्यावेळी वागळे पोलिसांनी १४९ ची नोटीस देण्यात आली होती.

आज ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू झालेल्या साखळी उपोषणास पोलिसांनी परवानगी दिलेली नाही. त्यामुळे मराठा समाजात नाराजी पसरली आहे.

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना उपोषण सोडविताना मराठा आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारने ३० दिवसांची मुदत मागितली होती. पाटील यांनी आणखी दहा दिवस मुदत वाढवून दिली.मात्र सरकारने ४२ दिवस उलटले तरी आरक्षण न दिल्याने जालना येथे मराठा नेता मनोज जरांगे पाटील यांनी दुसऱ्यांदा आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यांना ठाण्यातून पाठिंबा देण्यात आला आहे. (Maratha Reservation)

Back to top button