पुण्यात मराठा आरक्षणासाठी स्वतःला संपवलं! नेमकं काय घडलं; चिट्ठीत लिहिलं असं की…

पुण्यात मराठा आरक्षणासाठी स्वतःला संपवलं! नेमकं काय घडलं; चिट्ठीत लिहिलं असं की…

आळंदी(पुणे) : पुण्यातील आळंदी येथे मराठा आरक्षणासाठी आणखी एकाने टोकाचं पाऊल उचललं आहे. या घटनेने पुण्यासह राज्यात एकच खळबळ उडाली आहे. मराठा समाजाला आरक्षण तसेच मुलाला अनुकंपावर नोकरी मिळत नसल्याच्या नैराश्यातून पुण्यातील नऱ्हे आंबेगाव येथील व्यंकट ढोपरे यांनी टोकाचे पाऊल उचलत आपलं जीवन संपवल आहे. आळंदी येथील इंद्रायणी नदीत त्यांचा आज सकाळी मृतदेह आढळला आहे.

अधिक माहित अशी की, मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे अशी चिठ्ठी लिहून आळंदी येथील इंद्रायणी नदीवरील सिद्धबेट बंधाऱ्यात उडी मारत एका जेष्ठ नागरिकाने स्वतःला संपवल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. शुक्रवारी रात्री उशिरा पासून अंधारात त्याचा नदीत शोध सुरू होता अखेर शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास वृद्धाचा मृतदेह हाती लागला आहे. मूळचे लातूरचे असलेले ढापरे कुटूंब अनेक वर्षे पुण्यात राहण्यास आहे. व्यंकट नर्सिंग ढोपरे (वय ६० वर्षे, मूळ रा उमरदरा, ता. शिरूर आनंदपाळ, जिल्हा लातूर, सध्या रा नऱ्हे आंबेगाव ) असे जीवन संपवलेल्या जेष्ठ नागरिकाचे नाव आहे.

'ती' चिट्टी पोलिसांच्या हाती

मराठ्यांना आरक्षण मिळाले पाहिजे या मागणी बरोबरच मुलाला सरकारी खात्यात अंशकालनी तत्वावर नोकरी न मिळाल्याचे,सरकारी चुकीच्या कार्यपद्धतीमुळे मुलगा बेकार फिरत असल्याने अस्वस्थ असल्याचे म्हंटले आहे. त्याच बरोबर ते स्वतः सरपंच असताना निराधारांसाठी अनुदान मिळावे यासाठी प्रयत्न केल्याचे म्हंटले आहे. त्याला यश आले नसल्याचे तसेच अनेक वेळा मराठा आंदोलनात संघर्ष केला असल्याचे म्हंटले आहे. तसेच हे शासन स्वतःची खळगी भरण्यात व्यस्त असून त्यांना जनतेच्या प्रश्नाचं काही पडल नसल्याचं म्हंटल आहे. न्याय मिळत नसल्याने निराशेपोटी आत्महत्या करत असल्याचं ढापरे यांनी चिट्टीत म्हंटल आहे. पुढील तपास आळंदी पोलीस करत आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news