thane news
thane news

ठाणे : बहिणीला भेटण्यास जाऊ दिले नाही म्हणून विवाहितेने चिमुरडीसह घेतली उडी

Published on

ठाणे : पुढारी वृत्तसेवा – सासरच्या मंडळींनी रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीला सातारा येथे भेटण्यास जाऊ दिले नाही म्हणून रागाच्याभरात २६ वर्षीय विवाहितेने आपल्या एक वर्षाच्या मुलीसह इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी घेऊन जीवन संपवल्याची घटना शुक्रवारी पहाटे ठाण्यात घडली. प्रियांका महेश मोहिते असे मृत झालेल्या विवाहितेचे नाव आहे. ध्रुवी ही एक वर्षाची चिमुरडीदेखील या घटनेत मृत झाली आहे.

ठाण्यातील कासारवडवली येथील जॉय स्क्वेअर या इमारतीच्या सहाव्या मजल्यावर राहणारे मोहिते कुटुंबात रक्षाबंधांच्या दिवशी किरकोळ घरगुती वाद झाला होता. यावेळी प्रियांका हिने तिच्या सातारा येथे राहणाऱ्या आपल्या बहिणीकडे जाण्याचा आग्रह धरला होता. मात्र, तिच्या सासरच्या मंडळींनी तिला जाण्यास विरोध केला. याच गोष्टीचा राग मनात धरून प्रियांकाने १ सप्टेंबर रोजी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास आपल्या एक वर्षीय मुलगी ध्रुवी हिला सोबत घेऊन सहाव्या मजल्यावरून उडी घेतली. यावेळी दोघांचाही जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच कासारवडवली पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून घटनेचा पंचनामा केला. या प्रकरणी सध्यातरी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून चौकशीनंतर दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे कासारवडवली पोलिसांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news