Chandrasekhar Bawankule: ३५० रूपयांचा चहा मिळणाऱ्या हॉटेलमधून गरिबांच्या गोष्टी: चंद्रशेखर बावनकुळे | पुढारी

Chandrasekhar Bawankule: ३५० रूपयांचा चहा मिळणाऱ्या हॉटेलमधून गरिबांच्या गोष्टी: चंद्रशेखर बावनकुळे

पुढारी ऑनलाईन डेस्क : विरोधी पक्षाची भारतीय राष्ट्रीय विकास समावेशक २८ पक्षांच्या आघाडीची (इंडिया) मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये शुक्रवारी (दि.१) औपचारिक बैठक होत आहे. या बैठकीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी टीकास्त्र सोडले आहे. ज्या हॉटेलमध्ये ३५० रूपयांचा चहा मिळतो, त्या हॉटेलमध्ये बैठक घेऊन गरिबांच्या गोष्टी केल्या जात आहेत, असा निशाणा बावनकुळे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना साधला. (Chandrasekhar Bawankule)

इंडिया आघाडीत सामील झालेल्या घटक पक्षांचा कोणताही अजेंडा नाही, विचार नाही, केवळ इंडिया आघाडीतील लोक घमंडिया आहेत. विरोधी पक्षांना २०१४, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत चांगलीच चपराक मिळाली आहे. परंतु आता त्यांची लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आकांडतांडव सुरू आहे. विरोधी आघाडीतील बहुतांश पक्षांना राहुल गांधी पंतप्रधान नको आहेत. तर २०२४ च्या निवडणुकीनंतर काँग्रेस विरोधी पक्षनेताही बनवू शकणार नाही, अशी अवस्था काँग्रेसची होईल. (Chandrasekhar Bawankule)

पंतप्रधान मोदी पुण्यातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरू आहे, यावर बावनकुळे म्हणाले की, मोदींनी मागील ९ वर्षांत जनतेच्या हिताचे निर्णय घेतले आहे. त्यामुळे जनतेचा त्यांच्या नेतृत्वावरील विश्वास दृढ झाला आहे. मोदी देशभरातून कुठूनही निवडणूक लढवू शकतात. आणि बहुमतांनी निवडून येऊ शकतात. पुण्यात मोदींनी निवडणूक लढवली, तर ते पुणेकरांच्या भाग्याचे असेल. पुण्यातील मतदार त्यांचे स्वागतच करतील.

हेही वाचा 

Back to top button