पुणे : पुढारी वृत्तसेवा : देशाचे पंतप्रधान नरेंद मोदी हे पुण्यातून लोकसभेची निवडणूक लढवणार असतील तर त्यांना त्यांच्या मतदार संघात पराभवाची भीती आहे. ज्याप्रमाणे मेधा कुलकर्णी यांच्यावर अन्याय झाला तसा आता कोणावर होईल हे पहावे लागेल, असा आरोप शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या उपनेते तथा प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषदेत केला.
अंधारे म्हणाल्या, मोदी पुण्यातून निवडणूक लढवणार असल्यास महाराष्ट्रातील 48 मतरदारसंघात भाजपला यश मिळेल अशी वक्तव्य भाजपचे नेते करत असतील तर राज्यात देवेंद्र फडणवीस 'ढ' आहेत असा त्याचा अर्थ होतो. मुख्यमंत्री पदाच्या लालसेपोटी त्यांनी इतर पक्षांबरोबर भाजपला ही बॅकफूटवर नेले आहे. सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील यांसारखे जुने भाजपचे कार्यकर्ते यांना सन्मान न देता बाहेरून आलेल्यांच्या हाती पदे वाटप केले आहे. देवेंद्र यानी चंद्रकांत पाटील यांचे पालकमंत्री पद काढले तरी चालेल पण त्यांना किमान निर्णय प्रक्रियेत ठेवावे, अशी मागणी ही अंधारे यांनी यावेळी केली.
इंडियातील कोणीही बाळासाहेबांच्या स्मारकाचे दर्शन घेतले नाही अशी चर्चा केली जाते, याबाबत अंधारे म्हणाले, आम्ही भावनिकतेचे प्रदर्शन करीत नाही. भाजपचे सावरकरांवर एवढेच प्रेम आहे तर त्यांनी सावरकरांना भारतरत्न का दिला नाही. त्याच प्रमाणे वल्लभभाई पटेल यांचा पुतळा उभारला आहे तर मग सावरकरांचा तसाच पुतळा उभा करणे अपेक्षित होते. त्यामुळे भाजपने भावनिकतेचे राजकारण करू नये.
वन नेशन वन एज्युकेशन आवश्यक
मोदी सरकारच्या गेल्या नऊ वर्षात मणिपूर घटना, खेळाडूंवरील अत्याचार, शेतकऱ्यांचे आंदोलन यामुळे विविध राज्यात भाजपला पराभवाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळेच वन नेशन वन इलेक्शन ही संकल्पना आणली. परंतु मोदी सरकारने वन नेशन वन एज्युकेशन ही संकल्पना राबविणे गरजेचे आहे, असे ही सुषमा अंधारेयांनी सांगितले.
नितेश बाळाला 'संस्कार व्हिटामिन' ची गरज
नितेश राणे बाळाने मागील काही गोष्टींचा विचार करावा. ज्या मम्मीचा उदोउदो करीत आहे त्याच मम्मीच्या मांडीवर दहा वर्षे बसून सत्ता उपभोगली. त्याचबरोबर जुहू येथे बंगला खरेदी करून बेकायदेशीर वाढीव बांधकाम ही केले. त्यामुळे ह्या नितेश बाळाला 'संस्कार' व्हिटामिनची गरज आहे, अशी टीका सुषमा अंधारे यांनी यावेळी केली.
हेही वाचा :