जिलेबीचे पैसे मागितले म्हणून दुकानदाराला उकळत्या तेलात ढकलले | पुढारी

जिलेबीचे पैसे मागितले म्हणून दुकानदाराला उकळत्या तेलात ढकलले

ठाणे : जिलेबीचे पैसे मागितले म्हणून राग अनावर झालेल्या एका माथेफिरूने दुकानदाराला वजनी काट्याने मारहाण करून त्यास उकळत्या तेलाच्या कढईत ढकलून दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या घटनेत दुकानदार राजेश यादव हा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलिसांनी सरवन नामक व्यक्तीविरोधात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

वागळे इस्टेट परिसरात राहणारे राजेश यादव व त्यांच्या भावाचे याच भागात मिठाईचे दुकान आहे. या दुकानात 25 ऑगस्ट रोजी रात्री 9.30 च्या सुमारास सरवनने जिलेबी घेतली. या जिलेबीचे पैसे दुकानदार राजेश याने मागितले. त्या रागातून सरवनने राजेशला वजन काट्याने मारहाण केली आणि जवळच उभ्या असलेल्या हातगाडीवर ढकलून दिले.

हेही वाचा : 

Back to top button