जबाबदारी टाळणारी मुले, सुनांविरोधात गुन्हा; काय आहे नेमकं प्रकरण? | पुढारी

जबाबदारी टाळणारी मुले, सुनांविरोधात गुन्हा; काय आहे नेमकं प्रकरण?

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : आपली देखभाल व जबाबदारी टाळणार्‍या मुले आणि सुनांविरोधात वडिलांनी म्हाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी निवृत्ती बाबुराव बुटटे (92, रा. वराळे, ता. खेड) यांना वयोमानानुसार स्वतः चा उदर निर्वाह करणे शक्य नाही. फिर्यादीला दोन मुले आणि दोन सुना आहेत. मात्र हे फिर्यादीच्या पालन पोषणाची जबाबदारी घेण्यास टाळाटाळ करत असून, त्यांना घराबाहेर हाकलून दिले आहे. या प्रकरणी फिर्यादी यांनी आपली दोन मुले आणि सुनांविरोधात म्हाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी जेष्ठ नागरिक आणि पालक यांचे पालन पोषण आणि कल्याण अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे.

असा आहे कायदा

ज्येष्ठ नागरिक आणि पालक यांचे पालन, पोषण व कल्याण अधिनियम 2007 – आई, वडील व वरिष्ठ नागरिक ह्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी, त्यांना, सन्मानाने आयुष्य व्यतीत करता यावे म्हणून आई-वडील व वरिष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम 2007 साली अंमलात आला आहे.

आपल्या जन्मदात्यांची देखभाल करणे, त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे ही प्रत्येक सज्ञान अपत्याची जबाबदारी आहे. आपण एकत्र रहात असा अथवा स्वतंत्र परंतु प्रत्येक मुला-मुलीने आपल्या वृद्ध आई-वडील, आजी-आजोबा यांची काळजी घेतलीच पाहिजे. अनेकदा याबाबत मुले बेफिकीर असतात. म्हणूनच या कायद्याची आवश्यकता आहे. पालकांची, वृद्धांची काळजी न घेणे, त्यांच्या गरजा पूर्ण न करणे, त्यांना आर्थिक हातभार न लावणे हा कायद्याने गुन्हा आहे.

हेही वाचा

पिंपरी : एकमेकांवर कोयत्याने वार; परस्परविरोधी गुन्हे दाखल

गव्हर्नन्स पुरस्कारामुळे पिंपरी-चिंचवड शहराच्या लौकिकात मानाचा तुरा

अहमदनगर लष्करी विभागाच्या हद्दीतील 634 बांधकामे अनधिकृत

Back to top button