

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा : "संजय राऊत यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. राऊत काहीही बरळतात, त्यांना चांगल्या हॉस्पिटलची गरज आहे. धनुष्यबाण पेलण्याची खरी ताकद एकनाथ शिंदे यांच्यात आहे" अशी टीका आमदार विश्वनाथ भोईर यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर केली. शुक्रवारी (दि.१७) केंद्रीय निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे गटाला शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह बहाल केल्यानंतर आमदार भोईर यांनी आनंद व्यक्त केला. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
यावेळी भोईर म्हणाले की, "स्वेच्छेने आमच्याबरोबर आलेले कार्यकर्ते आमच्याच बरोबर आहेत. काठावर उभे असलेले कार्यकर्ते धनुष्यबाण शिंदे गटाकडे कधी येईल आणि शिंदे गटात कधी जाईल याची वाट पाहत होते. अशा कार्यकर्त्यांना घ्यायचं की नाही याची चर्चा सगळे एकत्र मिळून करू. त्यांना पक्षात घ्यायच की नाही हे ठरविण्याचा अधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आहे," असे ते म्हणाले.
"संजय राऊत यांच्या डोक्यावर परिणाम झाला असून ते आता काहीही बरळतील. धनुष्यबाण हातातून गेल्यामुळे ते सर्वजण बावचळले आहेत. धनुष्यबाण पेलण्याची खरी ताकद एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. त्यामुळेच हा उठाव करण्यात आला आणि त्यासाठी आम्ही सर्वांनी त्यांना साथ दिली. बहुमताच्या जोरावरच निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह दिले आहे. त्यामुळे संजय राऊत असो किंवा अजून कोणी, त्यांच्या बोलण्याने काही फरक पडत नाही. बाळासाहेब ठाकरेंचे विचार घेऊनच आम्ही पुढे चाललो आहोत. आम्हाला पूर्णपणे खात्री होती की निवडणूक आयोग आमच्या बाजूने निर्णय देणार आणि चिन्ह आणि शिवसेना पक्ष हे नाव आम्हालाच मिळणार. आम्हाला अपेक्षित असाच निकाल आयोगाने दिला आहे. लोकशाहीला बहुमताचा आधार असतो. बहुमत आमच्या बाजूने आहे," असे भोईर म्हणाले.
हेही वाचा :