सांगली : आमदार जयंत पाटील यांच्याकडून जुने स्नेही बी. के. पाटील यांची विचारपूस | पुढारी

सांगली : आमदार जयंत पाटील यांच्याकडून जुने स्नेही बी. के. पाटील यांची विचारपूस

विटा : पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांची इस्लामपूर येथे भेट घेवून विशाल पाटील यांनी त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. यावेळी आमदार पाटील यांनी विशाल यांच्याकडे महावितरणचे सेवानिवृत्त अधिकारी बी. के. पाटील यांची आवर्जुन विचारपूस केली.

आमदार पाटील यांचा शुक्रवारी ६१ वा वाढदिवस झाला. यानिमित्त विटा येथील महावितरण कंपनीचे सेवानिवृत्त अधिकारी बाबासाहेब पाटील यांचे चिरंजीव विशाल पाटील यांनी इस्लामपूरमध्ये आमदार पाटील यांचे अभिष्टचिंतन करून शुभेच्छा दिल्या. आमदार पाटील आणि बाबासाहेब पाटील तथा बी. के. पाटील यांचा जुना स्नेह आहे. शुभेच्छा दिल्यानंतर पाटील यांनी विशाल यांच्याकडे वडिलांच्या तब्बेतीची विचारणा केली. शिवाय “काय बरं चाललंय ना ? काही लागलं तर सांगत जा ” असे सांगितले.

हेही वाचा : 

Back to top button