ठाणे : राज्यात सरकार बदललं अन् गुंतवणूक करणाऱ्यांची रीघ लागली : एकनाथ शिंदे | पुढारी

ठाणे : राज्यात सरकार बदललं अन् गुंतवणूक करणाऱ्यांची रीघ लागली : एकनाथ शिंदे

ठाणे : पुढारी वृत्तसेवा – आधीच्या सरकारला कंटाळून उद्योजक पळून जात होते. मात्र जेव्हा सरकार बदललं तेव्हा पुन्हा एकदा उद्योजकांचा ओघ महाराष्ट्रात सुरू झाला आहे, असा ठाकरे सरकारचा समाचार घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी  महाराष्ट्रात लवकरच रोजगार उपलब्ध होतील, असे आश्वासन ठाणे येथे बोलताना दिले. रेमंड मैदानात आयोजित एमसीएच्या क्रीडाई प्रॉपर्टी एक्सपोर्ट ‘या’ प्रदर्शनाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आज भेट दिली. त्यादरम्यान ते बांधकाम व्यवसायिकांशी बोलत होते.

यावेळी त्यांनी आमचं सरकार आल्यापासून महाराष्ट्र राज्यात गुंतवणूक करणाऱ्यांची रीघ लागली असल्याचे सांगत सहा महिन्यांत कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक राज्यात पुन्हा आणण्यात आम्ही यशस्वी झाल्याचे स्पष्ट केले. ज्यावेळी शिंदे- फडणवीस यांचे सरकार आले त्यानंतर दोन महिन्यांतच उद्योगधंदे महाराष्ट्र बाहेर गेल्याची चर्चा झाली. त्यावेळी आम्ही तत्काळ मोदीजींशी संवाद साधला. त्यांनी सांगितलं की, आधीच सरकार उद्योजकांना मदत करत नव्हतं. त्यामुळे ते राज्यातून गेले. मात्र आता डबल इंजिनचा सरकार आहे. आपले एकच विचारांचे सरकार असल्यामुळे मोदींचे सहकार्य आणि आपले जोरदार प्रयत्न यामुळे पुन्हा एकदा राज्यात प्रचंड प्रमाणात गुंतवणूक आणण्यात यशस्वी झालो असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे प्रदर्शन गेले वीस वर्षे भरत असून या ठिकाणी ग्राहकांनादेखील फायदा होतो. ग्राहकांचे घर  घ्यायचे स्वप्न असते.  या अशा प्रदर्शनामुळे ग्राहकांना या ठिकाणी निवड करायची संधी मिळते, असे त्यांनी सांगितले. घर घेतानाच लोन घेण्यासाठी ग्राहकांना इकडे तिकडे फिरावे लागणार नाही. एकाच छताखाली सर्व व्यवहार त्यांना पूर्ण करण्याची संधी मिळेल, असे सांगताना पुनर्बांधणी प्रकल्पांना देखील अशा प्रदर्शनामुळे चालना मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

नाशिक जिल्ह्याच्या विकासासाठी ज्या शिवसैनिकांनी बाळासाहेब ठाकरेंसोबत काम केले आहे अशा शिवसैनिकांनी बाळासाहेबांच्या शिवसैनिक प्रवेश केला आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यात बाळासाहेबांच्या शिवसेना संघटनेला अधिक बळ मिळेल असे त्यांनी सांगितले. यावेळी शिवाजी पालकर, राजेंद्र घुले, गणेश शेलार, सोपान देवकर, रामभाऊ तांबे, भाऊसाहेब निकम, मंगेश दिघे, प्रशांत जाधव राजेंद्र जोशी, विजय निकम आदी पदाधिकाऱ्यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.

Back to top button