आदित्य ठाकरे नाशिक दौऱ्यावर असतानाच ठाकरे गटाला धक्का, 'या' शिवसैनिकांचा शिंदे गटात प्रवेश | पुढारी

आदित्य ठाकरे नाशिक दौऱ्यावर असतानाच ठाकरे गटाला धक्का, 'या' शिवसैनिकांचा शिंदे गटात प्रवेश

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क

आदित्य ठाकरे नाशिक दौ-यावर असताना ठाकरे गटाला पुन्हा एकदा मोठे भगदाड पडले आहे. जवळपास 50 हून अधिक शिवसैनिकांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला आहे.

ठाकरे गटाला गळती लागल्यानंतर युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे पहिल्यांदाच नाशिक दौ-यावर आहेत. आज सायंकाळी देवळाली गावात ते जाहीर सभा घेणार आहेत. परंतु त्यापूर्वीच शिंदे गटाने ठाकरे गटाला आणखी एक जोरदार झटका दिला आहे. नाशिकमधील अनेक ज्येष्ठ शिवसैनिकांनी  बाळासाहेबांच्या शिवसेनेला समर्थन देत मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज शिंदे गटात प्रवेश केला आहे.

याआधीच ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यानंतर अजय बोरस्ते, भाऊसाहेब चौधरी यांनी देखील शिवसेना सोडचिठ्ठी दिल्याने शिवसेनेसाठी तो फार मोठा धक्का होता. आता पुन्हा आदित्य ठाकरे नाशिकमध्ये असताना शिवसेनेतील अनेक जुन्या पदाधिका-यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.

यांनी केला प्रवेश 

याप्रसंगी नाशिक महानगरातील शिवाजी पालकर, राजेंद्र घुले, गणेश शेलार, सोपान देवकर, रामभाऊ तांबे, भाऊसाहेब निकम, मंगेश दिघे, प्रशांत जाधव, विजय निकम, मयूर जोशी, रणजीत खोसे, निलेश शेवाळे, दौलत बाबू शिंदे, अमोल जोशी, नरेंद्र ढोले, सुनील चव्हाण,नामदेव पाईकराव, ओमप्रकाश अग्रवाल,शंकरराव खेलूकर, बाळू, मुरलीधर टिळे, कचरू महादेव आवारे,हिरामण दामू धोंगडे, बाबुराव अमृता बोराडे, विठ्ठल सोनवणे, सदाशिव लांडगे,
पांडुरंग पुंजा ताजनपुरे, बबन किसन बोराडे, भाऊसाहेब कोंडाजी आवारे, नामदेव हरी बोराडे, कचेश्वर पोपटराव ताजनपुरे,  बाळू भोसले, पोपट बाबू सोमवंशी, महादू लोखंडे, ज्ञानेश्वर लोखंडे, बापू रामा पाबळे, शंकर महादू शिंदे
अंबादास बाबुराव लोखंडे, अशोक आप्पा पवार, रउफशेख रकीउद्दिन राजेंद्र शिंदे, संतोष लोखंडे, सनी शिंदे, सतीश शिंदे, अजय शिंदे आदी ज्येष्ठ शिवसैनिकांनी प्रवेश केला.

Back to top button