ठाणे : मावस बहिणीनेच लंपास केले २० लाखांचे दागिने | पुढारी

ठाणे : मावस बहिणीनेच लंपास केले २० लाखांचे दागिने

डोंबिवली, पुढारी वृत्तसेवा : डोंबिवली येथे पर्स मधील चावी चोरून मावस बहिणीनेच घरातील कपाटातून 20 लाख रूपये किंमतीचे 400 ग्रॅम सोन्याचे दागिने चोरले. सिमरन पाटील असे या आरोपीचे नाव आहे. दरम्यान पोलिसांनी संशयित महिलेला 24 तासाच्या आत अटक केली.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, प्रिया सक्सेना या एका कार्यक्रमासाठी कामोठे नवी मुंबई येथे गेल्या होत्या. त्‍यावेळी मावस बहीण सिमरनने प्रीयाच्या पर्स मधून घराची व तिजोरीची चावी काढून घेतली होती. त्यानंतर आरोपी सिमरन ही प्रिया यांच्या घरी आली. कोणालाही संशय येऊ नये यासाठी तिने प्रियाचे कपडे परिधान केले होते. त्यानंतर कोरलेल्या चावीने घरात तिजोरीतून 400 ग्रॅम सोन्याचे दागिने घेतले.

दरम्‍यान, प्रिया घरी आल्यानंतर आपल्‍या घरात चोरी झाल्याचे समजले. यानंतर तात्‍काळ मानपाडा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपी सिमरनला ताब्‍यात घेतले. तिची चौकशी केली असता तिने चोरी केल्याचे कबूल केले.

.हेही वाचा 

बारामती : कोयता अन् फोयता गँग चालणार नाही : विरोधी पक्षनेते अजित पवार

औरंगाबाद : वाळूज येथे शिर धडावेगळे करून अनोळखी तरुणाचा निर्घृण खून

सातारा : जावलीत अवैध दारू, मटका अड्डयांचा सुळसुळाट

Back to top button