ठाणे : पंजाब येथून हत्या करून पळालेल्‍या तीन शार्प शूटरर्संना अटक | पुढारी

ठाणे : पंजाब येथून हत्या करून पळालेल्‍या तीन शार्प शूटरर्संना अटक

डोंबिवली, पुढारी वृत्तसेवा : पंजाबमध्ये खून करून फरार झालेल्या आरोपींना मोहने येथील यादव नगर परिसरातून अटक करण्यात आली. ही कारवाई पंजाब अँटी गँगस्टर पोलीस, मुंबई एटीएस आणि खडकपाडा पोलिसांनी संयुक्तरीत्या केली.  या तिघांना कल्याण न्यायालयात हजर करण्यात येणार असून, पंजाब पोलीस या तिघांना घेऊन पंजाबला रवाना होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, शिवम सिंग, गुरुमुख सिंग, अमनदिप कुमार अशी आरोपींची नावे आहेत. हे तिघे शार्प शूटर असून, सोनू खत्री गँगशी संबंधित आहेत. पंजाब येथील मख्खन सिंग यांची गो‍ळ्या झाडून खून केल्यानंतर आरोपींनी महाराष्ट्रात पळ काढला. मनदीप सिंग याला पंजाब पोलिसांनी अटक केली. चौकशी दरम्यान त्याने तिघांची माहिती दिली.

पंजाब पोलिसांनी मिळालेल्‍या माहितीवरून शोध घेतला असता कल्याण येथील मोहने परिसरात असणाऱ्या यादव नगर वस्तीमध्ये तिघेही राहत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर मुंबई एटीएस आणि खडकपाडा पोलिसांच्या सहाय्याने या तिघांनाही सोमवारी पहाटे चार वाजता अटक करण्यात आली. यावेळी जवळपास शंभर पोलीस सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले होते. त्यांच्याकडून अनेक गुन्ह्याचा उलगडा होईल असे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा :

Back to top button