ठाणे : महापालिकेची एकाच ठिकाणी दोनदा कारवाई; पालिकेकडून पासिद्धी पत्रक जारी | पुढारी

ठाणे : महापालिकेची एकाच ठिकाणी दोनदा कारवाई; पालिकेकडून पासिद्धी पत्रक जारी

डोंबिवली; भाग्यश्री प्रधान : रेरा आणि केडीएमसीची फसवणूक करुन बागेच्या बेकायदा बांधकामावर महापालिकेच्या कारवाई पथकाने हातोडा चालविला आहे. मात्र एकाच इमारतीवर दोनदा कारवाई केल्याची प्रेस नोट पालिकेने प्रसिद्ध केली. त्यामुळे पुन्हा एकदा पलिकेच्या या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.

कल्याण-डोंबिवली बनावट कागदपत्रांच्या आधारे रेरा परवानगी मिळवणाऱ्या सबंधित बांधकाम व्यावसायिकाची वस्तू विशारद संदीप पाटील यांनी न्यायालयात तक्रार केली होती. त्यानंतर याप्रकरणात एसआयटीनं लक्ष घालून फार्स आवळण्यास सुरुवात केली. त्यानंतर या प्रकरणाशी सबंधित ४० बांधकाम व्यावसायिकांची बँक खाती गोठवण्यात आली आहेत. त्यानंतर पालिकेने देखील पुढाकार घेऊन अनेक अनधिकृत बांधकामे पाडण्याची सूत्र हाती उचलले आहे. मात्र एकाच इमारतीवर महापालिका अधिकाऱ्यांनी दोनदा कारवाई केली असून तसे प्रसिद्धी पत्रक देखील महापालिकेने काढले आहे.

याआधी एकदा नोव्हेंबर २०२२ मध्ये ज्या ठिकाणी कारवाई केली होती, आता त्याच्या ठिकाणी शनिवारी (दि. ७) रोजी पुन्हा कारवाई केल्याचे समोर आले आहे. ही कारवाई ९ आय विभागाच्या सहा. आयुक्त हेमा मुंबरकर, ५ / ड प्रभागाचे सहा.आयुक्त चंद्रकांत जगताप, अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे अधिक्षक हनुमंत यादव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. एकच ठिकाणी दोन वेळा कारवाई करण्यात आली आहे.

यासंदर्भात वास्तुविशारद संदीप पाटील यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना कारवाई करण्याची इच्छा नसते. केवळ प्रसिद्धी पत्रक काढून ते केल्याचे नागरिकांना भासवतात. कोणाचा फोन आला की कारवाई अर्धवट सोडतात. त्यामुळे पुन्हा पुन्हा त्याच ठिकाणी कारवाई करण्याची वेळ अधिकाऱ्यांवर येते असे सांगितले.

याआधी केलेली कारवाई

१७ नोव्हेंबर २०२२ रोजी आडवली ढोकली गावातील विकासक शिवसागर गुरुचरण यादव यांच्या बांधकामावर कारवाई केली होती. ९ आय प्रभागाचे सहाय्यक आयुक्त किशोर ठाकूर यांनी ही कारवाई केली. यामध्ये रेरा प्रकरणातील बोगस परवानगी असलेल्या इमारतीवर कायदेशीर कारवाई पूर्ण केली होती. यावेळी अतिक्रमण निर्मूलन पथकाच्या सहाय्यक आयुक्त सविता हीले यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली होती.

१७ नोव्हेंबरला कारवाई झाली होती. मात्र पुन्हा या बांधकाम व्यावसायिकांनी तिथे स्लॅब टाकण्यास सुरुवात केली त्यामुळे पुन्हा ७ जानेवारी रोजी ही कारवाई करण्यात आली.
सुधाकर जगताप , उपायुक्त अतिक्रमण विभाग

हेही वाचा

Back to top button