ठाणे : १ कोटीहून अधिक किमतीचा गुटखा जप्त, ६ जणांवर गुन्हा दाखल
पुढारी ऑनलाईन : ठाण्यातील भिवंडी येथे अन्न आणि औषध प्रशासन विभागाने छापा टाकत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत विभागाने १ कोटीहून अधिक किमतीचा विक्रीसाठी बंदी असलेला गुटखा जप्त केला आहे. ही कारवाई मंगळवारी (दि.२२) भिवंडी परिसरात करण्यात आली. यामधील 6 आरोपींविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
Maharashtra | FDA (Food and Drug Administration) seized banned ‘gutka’ worth more than Rs 1 Crore in a raid in Bhiwandi area of Thane on 22nd November. FIR registered against 6 accused. pic.twitter.com/acy83boD8D
— ANI (@ANI) November 24, 2022