ठाणे : चाकूचा धाक दाखवून प्रवाशांना लुटणारी टोळी गजाआड | पुढारी

ठाणे : चाकूचा धाक दाखवून प्रवाशांना लुटणारी टोळी गजाआड

डोंबिवली, पुढारी वृत्तसेवा : रेल्वे स्‍थानकाच्या बाजूला उभ्या असलेल्या एका इसमाला चाकूचा धाक दाखवून लुटण्यात आले होते. दरम्यान यातील काही आरोपी हे सराईत गुन्हेगार असल्याचे उघडकीस आले असून तीन जणांना पोलिसांनी अटक केली आहे तर एक जण फरार आहे. रोहित मुकेश तेजी (वय 21), लखन मनोहर गायकवाड (वय 22), दीपक लक्ष्मण वासकर (वय 28) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून मध्य रेल्वेच्या रेल्वे स्थानकावर लुटीचे प्रमाण वाढले आहे. यासंदर्भात आणखी एक तक्रार कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी एका टोळीला अटक केली आहे. यातील काही आरोपी हे सराईत गुन्हेगार असल्याचं समोर आल आहे.

उल्हासनगर रेल्वे स्थानकात अंबरनाथ रेल्वे स्थानकाच्या बाजूला पटरीवर उतरून तक्रारदार हे लघुशंका करत होते. यावेळी चार इसम त्या ठिकाणी आले आणि त्यांना दमदाटी करू लागले. एकाने चाकू दाखवत त्यांना धमकावले. तक्रारदाराच्या जवळ असलेला मोबाईल हिसकावून घेण्यात आला तसेच रोख रक्कम सुद्धा काढून घेण्यात आली.

तीन आरोपींना कल्याण लोहमार्ग पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. तर एकाचा शोध सुरू आहे. यापैकी रोहित हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर 12 गुन्हे दाखल आहेत. तर लखन गायकवाड याला देखील अगोदर अनेक गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा 

Russia Ukraine War : स्फोटानंतर आण्विक केंद्राला मोठा धोका

कोल्‍हापूर: अब्दुल लाट ग्रामपंचायतीवर अतिक्रमण धारकांचा मोर्चा

रायगड : बॅाडीबिल्डर स्पर्धेत सुभाष पुजारी यांनी पटकावले गोल्ड मेडल 

Back to top button