हर हर महादेव चित्रपट : मार खाणारा तो प्रेक्षक कोण? त्याचा राज ठाकरे यांच्याशी काय संबंध | पुढारी

हर हर महादेव चित्रपट : मार खाणारा तो प्रेक्षक कोण? त्याचा राज ठाकरे यांच्याशी काय संबंध

ठाणे; दिलीप शिंदे : छत्रपती शिवाजी महाराज आणि इतिहासाचे विकृतीकरण करणाऱ्या चित्रपटाविरोधात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वंशजांनी उडी घेतलीय. त्यानंतर सोमवारी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ‘हर हर महादेव’ चित्रपट बंद पडला. तेव्हा एका प्रेक्षकाला मारहाण झाली. तो प्रेक्षक कोण होता? त्याचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि ठाणे पालघर अध्यक्ष अविनाश जाधव यांचे काय संबंध? याबाबत नवीन माहिती समोर आली आहे.

‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटावरून संभाजीराजे छत्रपती भडकले आहेत. त्यांनी सर्व निर्मात्यांना इशारा देऊन छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांचे चुकीचे इतिहास व त्याचे विकृतीकरण थांबविण्याचा इशारा दिला आहे. त्यानंतर राज्यभरात प्रसिद्ध अभिनेते सुबोध भावे यांचा हर हर महादेव हा चित्रपट बंद पाडण्यात आला.

ठाण्यात तो राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी बंद पाडला. त्यावेळी तिकिटाचे पैसे परत करा आणि कोण जितेंद्र आव्हाड असे उर्मट प्रश्न करीत चित्रपट बंद करण्यास एका प्रेक्षकाने विरोध केला. त्यातून काही आंदोलनकर्त्यांनी त्याला मारले. यावरून मनसे आक्रमक झाली आणि नव्या वादाला तोंड फुटले.

मनसेच्या कार्यकर्त्यांनी पुन्हा शो सुरू करून राष्ट्रवादी काँग्रेसला उत्तर दिले. असे का झाले असावे, मनसेने का उडी घेतली, इतिहासाचे विकृतीकरणं झाले असताना मनसेने चित्रपटाला का पाठिंबा दिला आहे. याबाबत चर्चा रंगली आहे. त्या चित्रपटाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आवाज असल्याने हा मनसैनिक हे चित्रपटासोबत आहेत. दुसरीकडे, प्रेक्षागृहात बंदला विरोध करणारा कोण प्रेक्षक होता?

तो प्रेक्षक दुसरा तिसरा कुणी नसून मनसेचा कार्यकर्ता आहे. ठाण्यातील उद्योजक दुर्वे होय. त्यांच्याच वडिलांचे चित्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काढले होते. तसेच दुर्वे हे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांचा मित्र असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता मनसेकडून माजी मंत्री आव्हाड यांच्याविरोधात कोणती भूमिका घेतली जाते. याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. त्याचवेळी प्रेक्षक दुर्वे आणि मनसे संबंधाबाबत मनसेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी दुजोरा दिला आहे.

Back to top button