माजी आयबी अधिकार्‍याचा म्हैसुरात अपघात नव्हे, खून! | पुढारी

माजी आयबी अधिकार्‍याचा म्हैसुरात अपघात नव्हे, खून!

बंगळूर : इंटेलिजन्स ब्युरोचे निवृत्त अधिकारी आर. एन. कुलकर्णी (वय 83) यांचा अपघाती मृत्यू हा घातपात असल्याचे कर्नाटक पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. पोलिसांच्या हाती लागलेल्या एका सीसीटीव्ही फूटेजमध्ये एका कारने जाणीवपूर्वक त्यांना धडक दिल्याचे दिसते आहे.

म्हैसूरमध्ये 4 जुलै रोजी, सकाळी फिरायला गेलेल्या आर. एन. कुलकर्णी यांचा अपघाती मृत्यू सुरुवातीला ‘हिट अँड रन’चे प्रकरण वाटत होते. सीसीटीव्ही फूटेजनंतर वेगळाच प्रकार समोर आला. आर. एन. कुलकर्णी यांनी ‘लव्ह जिहाद’वर तीन पुस्तके लिहिली होती. यामुळे त्यांची हत्या झाल्याचा संशय आहे. कुलकर्णी यांची हत्या अत्यंत अस्वस्थ करणारी आहे, असे भाजप नेते सुनील देवधर यांनी म्हटले आहे. दुसरीकडे जमिनीच्या वादातून ही हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Back to top button