Kantara | ‘कांतारा’चा धुमाकूळ, टॉप २५० चित्रपटांच्या यादीत अव्वल स्थानी, रजनीकांत यांनीही केले कौतुक

Kantara | ‘कांतारा’चा धुमाकूळ, टॉप २५० चित्रपटांच्या यादीत अव्वल स्थानी, रजनीकांत यांनीही केले कौतुक

पुढारी ऑनलाईन डेस्क : ऋषभ शेट्टीचा अॅक्शन-थ्रिलर चित्रपट कांतारा (Kantara) याने IMDb द्वारे एकत्रित केलेल्या भारतातील सध्याच्या टॉप २५० चित्रपटांच्या यादीत अव्वल स्थान पटकावले आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करत असून त्याला IMDb ने ८.६ रेटिंग दिले आहे. 'कांतारा' ने १९९३ मधील रामायण : द लिजेंड ऑफ प्रिन्स रामा (अॅनिमिटेड चित्रपट), आर माधवनचा चित्रपट रॉकेट्री : द नांबी इफेक्ट, कमल हसनचा २००३ मधील चित्रपट अंबे शिवम आणि १९८७ मधील मणिरत्नम दिग्दर्शित नायकन चित्रपटाला मागे टाकले आहे. कांतारा हा अॅक्शन थ्रिलर कन्नड चित्रपट आहे. ऋषभ शेट्टी यांनी तो दिग्दर्शित केला आहे.

१९९३ च्या रामायण : द लिजेंड ऑफ प्रिन्स रामा या ॲनिमेटड चित्रपटाला ८.५ रेटिंग मिळाले होते. तर आर माधवनच्या रॉकेट्री : द नांबी इफेक्टला १० पैकी ८.४ रेटिंग मिळाले होते. तर अंबे शिवम आणि नायकन या दोन्हींचे रेटिंग ८.४ होते. कांताराला एका यूजर्सने १० रेटिंग देत लिहिले आहे.

रजनीकांत यांच्याकडून कांतारा टीमचे कौतुक

या चित्रपटाचे दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनी कौतुक केले आहे. "अज्ञात हे ज्ञात पेक्षा जास्त आहे हे होंबळे फिल्म्सच्या कांतारा चित्रपटापेक्षा जास्त चांगलं कोणीही म्हणू शकत नाही. लेखक, दिग्दर्शक, अभिनेता आणि चित्रपटातील संपूर्ण कलाकारांचे आणि टीमचे अभिनंदन." असे रजनीकांत यांनी ट्विट करत म्हटले आहे.

कांतारामध्ये मुख्य भूमिका साकारणारा तसेच चित्रपटाचे दिग्दर्शन करणारा ऋषभ शेट्टीने म्हटले आहे की रजनीकांत यांनी कौतुक केल्याने माझे स्वप्न पूर्ण झाले आहे. शेट्टीने ट्विट करत पुढे म्हटले की, "प्रिय रजनीकांत सर. तुम्ही भारतातील सर्वात मोठे सुपरस्टार आहात आणि मी लहानपणापासून तुमचा चाहता आहे. तुमच्याकडून कौतुकाची थाप मिळाल्याने माझे स्वप्न पूर्ण झाले आहे. तुम्ही मला प्रोत्साहन दिले. धन्यवाद सर."

ऋषभ शेट्टीचा कन्नड चित्रपट 'कांतारा'चा (Kantara) बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ सुरु आहे. एकापाठोपाठ अनेक विक्रम चित्रपटाच्या नावावर जमा होऊ लागले आहेत. हा चित्रपट हिंदीतही प्रदर्शित झाला आहे. त्याचबरोबर या चित्रपटाने केजीएफचा विक्रम मोडीत काढला आहे. 'कांतारा'ने केजीएफला मागे टाकत कमाईच्या बाबतीत जबरदस्त विक्रम केला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'कांतारा'  (Kantara)  हा कर्नाटकातील होंबळे प्रॉडक्शन हाऊसचा सर्वाधिक पाहिला जाणारा चित्रपट ठरला आहे. 'कांतारा'शी संलग्न त्याचे बॉक्स ऑफिस कलेक्शन जबरदस्त आहे. या चित्रपटाचे एकूण कलेक्शन १४५ कोटी रुपये आहे. कांतारा हा कमी बजेटचा चित्रपट असून १५ ते २० कोटी रुपयांमध्ये बनवण्यात आला आहे.

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news