महाप्रबोधनाची यात्रा संपूर्ण महाराष्ट्रात झंझावात तयार करेल : सुषमा अंधारे | पुढारी

महाप्रबोधनाची यात्रा संपूर्ण महाराष्ट्रात झंझावात तयार करेल : सुषमा अंधारे

ठाणे; पुढारी वृत्तसेवा : चिन्ह गोठवल्यामुळे शिवसेनेला फरक पडत नाही, जे भीतीने गारठलेले आहेत. ते चिन्ह व नाव गोठवण्याचा प्रयत्न करतात. पण, शिवसेनेचा विचार, अस्मिता, आणि स्पिरिट कधीच गोठवू शकत नाहीत. हा उत्साह, ही गर्दी त्याचं एक उदाहरण आहे. महाप्रबोधनाची यात्रा संपूर्ण महाराष्ट्रात झंझावात तयार करेल, असे मत शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी ठाण्यात झालेल्या पहिल्या मेळव्यानंतर व्यक्त केले.

चिन्ह घेण्याची तयारी दुसऱ्या गटाकडून सुरू असल्याचे निदर्शनास येत आहे, असा प्रश्न त्यांना विचारला असता त्यांनी काय करावं हा त्यांचा विषय आहे. त्यासाठी आम्हाला जास्त डोकं लावायची गरज नाही. आम्हाला काय केलं पाहिजे आणि जनता आमच्याकडं काय अपेक्षा करते, हे बघणं अतिशय महत्त्वाचं आहे. कटकारस्थान करणे शिवसेनेचे काम नाही, आमचं काम जनतेच्या प्रश्नासाठी उभा राहणं हे आहे.

हेही वाचा;

Back to top button