लातूर : देवदर्शनाला गेलेल्या भक्तांवर काळाचा घाला, कार-ट्रकच्या भीषण अपघातात बाप-लेक जागीच ठार | पुढारी

लातूर : देवदर्शनाला गेलेल्या भक्तांवर काळाचा घाला, कार-ट्रकच्या भीषण अपघातात बाप-लेक जागीच ठार

औसा, पुढारी वृत्तसेवा : शिर्डीहून साईबाबांचे दर्शन घेऊन आंध्र प्रदेशातील हैदराबादला निघालेल्या भक्तांवर काळाने घाला घातला. हैदराबादकडे निघालेल्या कारला समोरून येणाऱ्या ट्रकने जोराची धडक दिली. यात कारचा चक्काचुर झाला. या भीषण अपघातात बाप आणि लेकीचा जागीच मृत्यू झाला. तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात औसा- लामजना रोडवरील वाघोली पाटी येथे घडला.

सायकुमार डुबली आणि त्यांची कन्या तनविका सायकुमार डुबली या दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर पवित्रा, नविश, श्याम आणि शौर्य  हे जखमी झाले आहेत. त्यांना लातूर येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे. पवित्रा सवरिया गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच किल्लारी पोलीस घटनास्थळी तात्काळ दाखल झाले असून त्यांनी पंचनामा केला आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button